नक्षत्रस्वामी - मंगलगान

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


मंगलगान

॥ श्री मंगलमूर्ति ॥

॥ श्री सिद्धराज ॥

जय जय अनादिसिद्धा । पूर्ण ब्रम्हांनंद प्रसिद्धा ।

मायाचक्रचालक अबद्धा । शिव शुद्ध चैतन्या ॥

जय जय हिमनगजामाता । नीलग्रीवा गणेशताता ।

निजमनोदय त्राता , दाता । त्रिपुरांतका ॥

श्रीनक्षत्रचरित्रवनविहारा । मज न्यावे कर्पुरगौरा ।

दुर्गम स्थळींचा निवारा । मज दाखवावा जगत्पते ॥

त्या स्थळीचे वापी , कूप । सुंदर , शीतल स्थळे अमाप ।

मज दाखवावी अनेक । षडास्यजनका , गंगाधरा ॥

शिवा तुझे देणे अद्‍भूत । शिरी ठेवावा वरदहस्त ।

घडो काव्य लेखन प्रशस्त । विनवी अत्यादरे वसंत ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-05-20T00:17:26.8430000