यंत्र - शनि यंत्र

यंत्राची श्रद्धापूर्वक शास्त्रोक्त आणि धार्मिक पूजा केल्याने अवश्य फळ मिळते.


१२

७

१४

१३

११

९

८

१५

१०

कायम स्वरुपाच्या फलश्रुतीसाठी हे यंत्र जाड तांब्याच्या पत्र्यावर बनवून घ्यावे.

पुराणोक्त शनि जप मंत्र

र्‍हीं नीलाञनसमाभासं रविपुत्र यमाग्रजम्‍ ।

छायामार्तण्ड - संभूतं तं नमामि शनैश्वरम्‍ ॥

अर्थः-- नील अंजनाप्रमाणे ज्याची दीप्ति आहे व जो सूर्य भगवानाचा पुत्र तसेच जमाचा मोठा भ्राता आहे सूर्याच्या छायेने ज्याची उत्पत्ति झाली आहे. त्या शनैश्वर देवतेस मी नमस्कार करतो.

वैदिक शनि मंत्र

ॐ शमग्निरित्यस्यरिंविठिः ऋषिः शनैश्चरप्रीत्यर्थ जपे विनियोगः ।

ॐ शमग्निरग्निभिः करच्छं नस्तपतु सूर्यः ।

शं वातो वात्वरपा अपस्त्रिश्वः ॥

तंत्रोक्त शनि मंत्र

प्रां प्रीं प्रौं शनये नमः ।

किंवा

ॐ ऐं र्‍हीं श्रीं शनैश्चराय नमः ।

जप संख्याः-- २३ हजार कलियुगात ९२ हजार.

शनि गायत्री मंत्र

ॐ भगवाय विद्महे मृत्युरुपाय धीमहि तन्नः शौरिः प्रचोदयात्‍ ।

शनिः-- पश्चिम दिशा, धनुष्याकार मण्डल, अंगुले दोन, सौराष्ट देश, कश्यप गोत्र, कृष्ण वर्ण, मकर - कुंभ राशीचा स्वामी, वाहन गिधाड.

समिधाः-- शनि

दान द्रव्यः-- नीलमणी, सोने, लोखं ड, उडीद, कुळीथ, तेल, काळा कपडा, काळे फुल, कस्तूरी, काळी गाय, म्हैस, खडाऊ

दानाची वेळः-- मध्यान्हकाल

धारण करण्याचे रत्नः-- सीलोनी, गोमेद, नसल्यास पांढरे चंदन.

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP