यंत्र - चंद्र यंत्र

यंत्राची श्रद्धापूर्वक शास्रोक्त आणि धार्मिक पूजा केल्याने अवश्य फळ मिळते.


१०

नगद्विनंदा गजषट् समुद्रा शिवाक्षदिग्बाण विलिख्यकोष्ठे ।

चंद्रकुतारिष्टविनाशयनाय धार्यं मनुष्यैः शशियंत्रमीरितम् ॥

पुराणोक्त चंद्र जप मंत्र

दधि, शंख, तुषाराभं क्षीरोदार्णव सम्भवम् ।

नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुट भूषणम् ॥

अर्थः-- दही, शंख, किंवा हिमा प्रमाणे ज्याचे तेज आहे व उत्पत्ति क्षीरसागरापासून आहे. जो भगवान शंकराच्या डोकीवर अलंकारासारखा विराजमान आहे. मी त्या चंद्रदेवास प्रणाम करतो.

वैदिक चंद्र मंत्र

ॐ आप्यायस्व गौतमः सोमो गायत्री सोमप्रीत्यर्थ जपे विनियोगः ।

ॐ आप्यायस्व समेतु ते विश्वतः सोम वृष्णयम् । भवा वाजस्य संगथे ॥

तंत्रोक्त मंत्र

श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः ।

किंवा

ॐ ऐं र्‍हीं सोमाय नमः ।

जप संख्याः-- ११ हजार कलियुगात ४४ हजार.

सोम गायत्री मंत्र

ॐ अमृताङ्गाय विद्महे कलारुपाय, धीमहि तन्नः सोमः प्रचोदयात् ।

चन्द्र -- अग्निकोण, चतुरस्र मण्डल, अगुळे ४, यमुनातटवर्ती देश

अग्निगोत्र, श्वेत वर्ण, कर्क राशीचा स्वामी, वाहन हरिण, समिधा पळस ।

दान द्रव्यः-- मोती, सोने, चांदी, तांदूळ, दही, पांढरा कपडा, पांढरे फूल, शंख, कापूर, पांढरे चंदन, दानाई वेळ संध्याकाळी ( गोरज मुहूर्त ) धारण करण्याचे रत्न मोती किंवा चंद्रकांत मणि न मिळाल्यास शिंपला.

 

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP