कार्तिक व. चतुर्दशी
Kartika vadya Chaturdashi
* कामावाप्तीव्रत
या तिथीस महाकालाची पूजा करतात.
फल - कामनापूर्ती.
* जलकृच्छ्रव्रत
कार्तिक व. चतुर्दशीस विष्णुपूजा व पाण्यात उभे राहून उपवास करणे, असा या व्रताचा विधी आहे.
फल - विष्णुलोकप्राप्ती.
प्रायश्चित्त म्हणूनही हे व्रत करतात. त्यात एक महिनाभर केवळ सातूचे पीठ पाण्यात कालवून खायचे असते. एक दिवस व एक रात्र काहीही न खात पाण्यात बुडून राहून वरुणाच्या मंत्राचा जप केला असत वर्षभर केलेया पापांचे क्षालन होते, असे सांगितले आहे. दिवसा उभे राहून व रात्री न झोपता पाण्यात काळ कंठावा व दुसर्या दिवशी १००८ वेळा गायत्रीमंत्राचा जप करावा, असाही पर्याय सांगितला आहे. या व्रताला उदकृच्छ्र, तोयकृच्छ्र, वरुणकृच्छ्र अशीही अन्य नावे आहेत.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008

TOP