दम्पत्यष्टमी
पुत्रप्राप्तीच्या इच्छॆने स्त्री-पुरुषांना हे व्रत करता येते. हे व्रत करताना आश्विन व. अष्टमी दिवशी दर्भाचे शिव-पार्वती तयार करून त्यांची पंचोपचार पूजा करावी. जवळच ब्राह्मणपूजन करून त्यास दक्षिणा द्यावी. या व्रताने पुत्रप्राप्ती होते. हे व्रत चंद्रोदयव्यापिनी तिथीस करावे; म्हणून दोन दिवस तिथी असेल अगर दोन्ही दिवस (चंद्रोदयव्यापिनी ) नसेल तर दुसर्या दिवशी व्रत करावे.