वत्सद्वादशी
या दिवशी दुपारच्या १२ पूर्वी गायवासराची पूजा करतात. त्यांना आदल्या दिवशी भिजवून ठेवलेल्या मूग, बाजरी आदींचा नैवेद्य दाखवतात आणि लतापल्लवांनी त्यांना सजवितात. व्रत करणार्या स्त्रिया जेवणात मूग, बाजरी, यांचाच समावेश करतात. या दिवशी गाईचे दूध, दही अथवा तूप वापरत नाहीत.