* पुत्रव्रत
या व्रतासाठी श्रावण व. सप्तमीला उपवास करून विष्णूचे पूजन करावे. दुसरे दिवशी
'ॐ क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा'
या मंत्राने तिळाच्या १०८ आहुती द्याव्यात. ब्राह्मणभोजन घालून बेलफळ खाऊन वर षड्रस (मधुर, आंबट, खारट, कषाय, तिक्त, कटू ) अन्न घ्यावे. याप्रकारे प्रत्येक सप्तमीला करून वर्षभर झाल्यावर दोन गोदाने दिल्यास पुत्रप्राप्ती होते.
* ललितासखी व्रत
श्रावण व. सप्तमीला हे व्रत करतात. सकाळी स्नानानंतर शुभ्र वस्त्रे नेसून नदीजवळून माती आणून त्याचे लिंग करावे व त्याची यथासांग पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. रात्री देवीच्यासाठी जागरण करावे व सकाळी सर्व वस्तू नदीकाठी नेऊन पुन्हा पूजा करून ब्राह्मण स्त्रियांना दान द्याव्यात व पूजा विसर्जन करावी. नंतर हवन, देव-पितर यांचे पूजन करून ब्राह्मणभोजन घालून दक्षिणा द्यावी. यायोगे सर्व मनोकामना पूर्ण होऊन शिवलोक प्राप्त होतो.