देवी कवच - दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला

दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला

दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गापद्विनिवारिणी ।
दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी ||
दुर्गतोद्धारिणी दुर्गानिहन्त्री दुर्गमापहा ।
दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला ॥
दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरुपिणी ।
दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता ॥
दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी ।
दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थंस्वरुपिणी ॥
दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी ।
दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्र्वरी ॥
दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी ।
नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम मानवः ॥
पठेत् सर्वभयान्मुक्तो भविष्यति न संशयः s॥
॥ इति दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला संपूर्णा ॥

१)स्वरूप ओळखण्यास कठीण २)कठीण पीडा दूर करणारी ३)असाध्य संकटे दूर करणारी ४)अविद्या दुर करणारी
५)दुर्बोध गोष्ट सुबोध करणारी ६)दारिद्र्याचा नाश करणारी ७) दुर्गतित सापडलेल्यांचा उद्धार करणारी ८) दुर्गदैत्याला मारणारी ९) अज्ञानाचा नाश करणारी १०) दुर्बोध ज्ञान देणारी ११) दुर्गदैत्यलोकाला वणव्याप्रमाणे जाळणारी १२)कळण्यास कठीण १३) जिचे दर्शन होण्यास कठिण १४) इंद्रियांना विषय न होणारा आत्मा हे जिचे स्वरुप अशी १५) कठीण प्रसंगि मार्गदर्शन करणारी १६) दुर्बोध ज्ञानस्वरूप १७) दुर्गम स्थानाचा आश्रय करणारी १८) अगम्य ज्ञानात राहणारी १९) गाढ ध्यानात प्रकाशित होणारी २०) दुस्तर मॊह निर्माण करणारी २१) कितीही कठीण प्रदेशात जाणारी २२) न कळणारा आत्मरूप अर्थ हे जिचे स्वरुप आहे अशी २४) भयंकर आयुधे धारण करणारी २५) अज्ञेय स्वरुपाची २६) प्राप्त होण्यास कठीण २७) जाणण्यास कठीण २८) दुर्गम अशा विश्र्वाचे नियमन करणारि २९) अत्यंत भयंकर  ३०) अत्यंत तेजस्वी ३१) अत्यंत सुंदर ३२) रोगपीडा नाहीशी करणारी जो मनुष्य मज दुर्गेची ही नामावळी म्हणेल, तो सर्व भयांपासून मुक्त होईल, यांत संशय नाही.
दुर्गाद्वात्रिंशन्नममाला संपूर्ण

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP