देवी कवच - श्रीसप्तश्लोकी

देवी कवच - श्रीसप्तश्लोकी

अथ सप्तश्लोकी दुर्गा
शिव उवाच
देवि त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी ।
कलौ कार्यसिद्ध्यर्थमुपायं ब्रूहि यत्नतः ॥
देव्युवाच
श्रृणु देव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्ट्साधनम् ।
मया तवैव स्नेहेनाप्यम्बास्तुतिः प्रकाश्यते ॥
ॐ अस्य श्रीदुर्गासप्तश्लोकीस्तोत्रमन्त्रस्य नारायण ॠषिः , अनुष्टुप
छन्दः, श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वत्यो देवताः ,श्री दुर्गाप्रीत्यथं
 सप्तश्लोकी दुर्गापाठे विनियोगः ।
ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा ।
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥ १ ॥
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः
स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।
दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या
सर्वोपकारकरणाय सदाऽऽर्द्रचित्ता ॥ २ ॥
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ३ ॥
शरणागतदीनार्तपरित्राणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ४ ॥
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते ॥ ५ ॥
रोगानशेषानपहंसि तुष्टा
रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् ।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां
त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्र्यन्ति ॥ ६ ॥
सर्वबाधाप्रश्मनं त्रैलोक्यस्याखिलेश्र्वरि ।
एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥ ७ ॥
 ॥ इति श्रीसप्तश्लोकी दुर्गा सम्पूर्णा ॥

शंकर म्हणाले, भक्तांना सहज प्राप्त होणार्‍या हे देवी, तू सर्व कार्ये सिद्ध करणारि आहेस. म्हणून या कलियुगात कार्य सिद्ध होण्याचा उपाय प्रयत्नपूर्वक सांग.
देवी म्हणाली, हे देवा, कलियुगात सर्व इच्छित गोष्टी प्राप्त करून देणारे साधन मी सांगते. ऐका. तसेच तुमच्यावरील प्रेमामुळेच मी (साधनरुप) ही देवीची स्तुती प्रकट करीत आहे.
ती महामाया भगवती देवी ज्ञानी लोकांचीसुद्धा (विवेकशील) मने बळेच ओढून मोहात ढकलते (तात्पर्य, महामायेच्या प्रभावामुळे ज्ञानी सुद्धा मोहित होतात.) ॥ १ ॥
हे दारिद्र्य व दुःखे यांपासूनचे भय दूर करणार्‍या देवी, संकटाच्या वेळी तुझे स्मरण केले असता सर्व प्राण्यांचे सर्व प्रकारचे भय तू नाहीसे करतेस. मुमुक्षूंनी तुझे स्मरण केल्यास त्यांना तु आत्यंतिक कल्याण करणारी मोक्षदायक बुद्धी देतेस.सर्वांवर उपकार करण्यासाठी जिचे अंतःकरण नेहमी कनवाळू आहे, अशी तुझ्याखेरीज दुसरी कोणती देवता आहे बरे! ॥ २ ॥
सर्व मंगल पदार्थांना जिच्यामुळे मांगल्य आले आहे अशा, सुखस्वरूप, सर्व कार्‍याची सिद्धी करणार्‍या, शरणागतांचे रक्षण करणार्‍या, तीन नेत्र असलेल्या, गौरवर्ण असणार्‍या, हे नारायणी ,तुला नमस्कार असो. ॥ ३ ॥
शरण आलेल्या दरिद्री व रोगादिकांनी पिडलेल्या भक्तांचे रक्षण करण्यात तत्पर असणा‍र्‍या व सर्वांची दुःखे दुर करणार्‍या हे नारायणी देवी,तुला नमस्कार असो. ॥ ४ ॥
सर्व विश्व हे जिचे स्वरुप आहे,जी सर्वांचे नियमन करणारी आहे,जी कर्तुम् अन्यथाकर्तुम् समर्थ आहे अशा हे देवी, सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण कर. हे दुर्गे देवी, तुला नमस्कार असो. ॥ ५ ॥
हे देवी, तू संतुष्ट झाली असता सर्व (ज्वरादी आणि भवरुप) रोग नाहीसे करतेस. पण रागावली असता सर्व इष्ट गोष्टी नाहीशी करतेस. तुझा आसरा घेतलेल्या माणसांवर संकटे येत नाहीत. उलट तुझा आश्रय घेतलेले इतरांना आधार देणारे ठरतात. ॥ ६ ॥
हे त्रैलोक्यस्वामिनी, तू त्रैलोक्याची सर्व दुःखे दूर केलीस. याचप्रमाणे (वेळोवेळी) आमच्या शत्रूंचा नाश करावास. ॥ ७ ॥

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP