अथ कीलकम्
ॐ अस्य श्रीकीलकमन्नस्य शिव ॠषिः अनुष्टुप् छन्दः श्रीमहासरस्वती
देवता ,श्रीजगदम्बाप्रीत्यर्थं सप्तशतीपाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ।
ॐ नमश्र्चण्डिकायै ॥
मार्कण्डेय उवाच
ॐ विशुध्दज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे ॥ १ ॥
सर्वमेतद्विना यस्तु मन्त्राणामभिकीलकम् ।
सोऽपि क्षेममवाप्नोति सततं जाप्यतत्परः ॥ २ ॥
सिद्ध्यन्तुच्चाटनादीनि वस्तूनि सकलान्यापि ।
एतेन स्तुवतां देवी स्तोत्रमात्रेण सिध्यति ॥ ३ ॥
न मन्त्रो नौषधं तत्र न किञ्चिदपि विद्यते ।
विना जाप्येन सिध्येत सर्वमुच्चातनादिकम् ॥ ४ ॥
समग्राण्यपि सिध्यन्ति लोकशङ्कामिमां हरः ।
कृत्वा निमन्त्रयामास सर्वमेवमिदं शुभम् ॥ ५ ॥
समाप्नोति सुपुण्येन तां यथावन्नियन्त्रणाम् ।
सोऽपि क्षेममवाप्नोति सर्वमेव न संशयः ॥ ६ ॥
कृष्णायां वा चतुर्दश्यामष्टम्यां वा समाहितः ।
ददाति प्रतिगृह्णाति नान्यथैषा प्रसीदति ॥ ७ ॥
इत्थंरुपेण कीलेन महादेवेन कीलितम् ।
निष्कीलां च तत: क्रुत्वा पठितव्यं समाहितैः ॥ ८ ॥
यो निष्कीलां विधायैनां नित्यं जपाति संस्फुतम् ।
स सिद्धः स गणः सोऽपि गन्धर्वो जायते नरः ॥ ९ ॥
न चैवाप्यटतस्तस्य भयं क्वापिह जायते ।
नापमृत्युवशं याति मृतो मोक्षमवान्पुयात् ॥ १० ॥
ज्ञात्वा प्रारभ्य कुर्वीत न कुर्वाणो विनश्यति ।
ततो ज्ञात्वैव सम्पन्नमिदं प्ररभ्यते बुधैः ॥ ११ ॥
सौभाग्यादि च यत्किञ्चिद् दृश्यते ललनाजने ।
तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जाप्यमिदं शुभम् ॥ १२ ॥
श्नैस्तु जप्यमानेऽस्मिन् स्तोत्रे सम्पत्तिरुच्चकैः ।
भवत्येव समग्रापि ततः प्रारभ्यमेव तत् ॥ १३ ॥
ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्यारोग्यसम्पदः ।
शत्रुहानिःपरो मोक्षः स्तुयते सा न किं जनैः ॥ १४ ॥
मार्कण्डेय म्हणाले, विशुद्धज्ञानस्वरुप, तीन वेदरूप दिव्य नेत्र असणार्या, परमकल्याणप्रप्तीचेकारण असणार्या, चंद्रकोर धारण करणार्या भगवान शंकरांना नमस्कार असो. ॥१॥
" इतर मंत्रांचे उत्कीलन करणयाची खटपट न करताही जो नेहमी सप्तशतीपाठ करण्यात तत्परअसतो, त्यालाही सर्व प्रकारे कल्याणकारक गोष्टी प्रप्त होतात." ॥२॥
केवळ हे सप्तशतीचे स्तोत्र जे म्हणतात, त्यांना देवी प्रसन्न होते. त्यांची उच्चाटन, वशीकरण इत्यादीसर्वच कार्ये साध्य होतात. ॥३॥
या सप्तशतीजपाशिवाय दुसरा मंत्र, दुसरे औषध यांची संकटनिवारणासाठी आवश्यकता नाही. याजपानेच उच्चाटनादी सर्व कार्ये साध्य होतात. ॥४॥
तसेच कोणतीही कामे या जपानेच साध्य होतात. (यामुळे अन्य मंत्र व औषधे निरर्थक ठरली आहेत. अशी जेव्हा इतर मंत्रद्रष्ट्या ऋषींनी भगवान शंकरांच्याकडे तक्रार केली तेव्हा) लोकांची ही भीतीलक्षात घेऊन भगवान शंकरांनी या संपूर्ण कल्याणकारक स्तोत्राला (पुढे सांगितल्याप्रमाणे) बंधने घातली. ॥५॥
जो,तो दान-प्रतिग्रहरूप नियम अत्यंत पवित्रपणे पूर्ण करतो, त्याला सर्वच कल्याण प्राप्त होते, यात शंकानाही. ॥६॥
(नियम असा-सप्तशतीचा पाठ करणार्याने आपल्याकडील सर्व धनधान्यादिक संपत्ती) एकाग्रचित्तानेकृष्ण चतुर्दशीला किंवा अष्टमीला देवीला अर्पण करावी आणि (तिचा प्रसाद समजुन) स्वीकारावी. असे न केल्यास ती प्रसन्न होत नाही. ॥७॥
अशा प्रकारच्या (फलप्रतिबन्धरुप) खिळ्याने श्रीमहादेवांनी हे देवीस्तोत्र प्रतिबद्धकेले आहे. म्हणून (वरील नियमाने) प्रतिबन्ध दूर करून एकाग्र अन्तःकरणाने सप्तशतीचा पाठ करावा. ॥८॥
जो या सप्तशतीचा प्रतिबन्धरहित करुन नेहमी स्पष्ट श्ब्दोच्चारपूर्वक पाठ करतो, तो सिद्ध, शिवांचा वादेवीचा गण किंवा वनात गन्धर्व होतो. ॥९॥
अरण्यात इत्यादी कोणत्याही ठिकाणी फिरत असता त्याला कोणापासूनही भय उत्पन्न होत नाही. त्याला अपमृत्यू येत नाही. आणि मेल्यानंतर मोक्ष मिळतो. ॥१०॥
गुरुंकडून हा पाठ अर्थ व पाठविधीसह जाणून घेऊन नंतर त्याच्या अनुष्ठानाला प्रारंभ करावा. संकल्प करून जो अनुष्ठान न करील, त्याचा नाश होतो. म्हणून ज्ञानी लोकांनी उत्कृष्ट गुणांनी युक्तअशा या स्तोत्राचा गुरुमुखातून ज्ञान करून घेऊनच पाठ करावा. ॥११॥
स्त्रियांच्या बाबतित सौभाग्य, पुत्रपौत्र असणे इत्यादी जे काही सुख दिसते, ते सर्व श्रीभगवतीच्या कृपेमूळे. म्हणून हे कल्याणकारक स्तोत्र जपावे. ॥१२॥
या स्तोत्राचा सावकाश जप केल्याने सर्व प्रकारची विपुल संपत्ती प्राप्त होतेच. म्हणून याचा पाठ अवश्यकरावा. ॥१३॥
जिच्या कृपेने सत्ता, सौभाग्य, आरोग्य, संपत्ती,शत्रुनाश आणि सर्वश्रेष्ठ मोक्ष प्रप्त होतो,तिची (सप्तशतिपाठाद्वारा) लोक का स्तुती करणार नाहीत? ॥१४॥