-
न. १ सौंदर्य . २ भाग्य ; नशीब एवढे एक सौभंग। - ज्ञा १५ . १७ . ३ ज्याचे योगानें आपणांस मान्यता , शोभा , प्रतिष्ठा , तेज इ० लाभतें असा अधिकार , विद्या , वतन , सामर्थ्य इ० विषय . ४ सवाष्णपणामुळें काजळ , शेंदूर , कुंकू , मंगळसुत्र , बांगड्या , इ० वस्तु धारण करण्याचा बायकांचा अधिकार ; सुवासिनीत्व . ५ कुंकू , शेंदूरं . [ सं . सुभग ; सौभाग्य ] म्ह० गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली = रुसून बसलेल्याची कोण पर्वा करतो अशा अर्थी योजतात . तोरा मिरविणें . सौभाग्याचा टिका - सौभाव्याचें चिन्ह , कुकू .
-
०चिन्ह द्रव्य न . कुंकू , बांगड्या वगैरे . तंतु पु . १ मंगळसूत्र . २ ( ल .) नवरा .
-
०धन न. नवरा . घातला तिच्या दृष्टानें सौभाग्यधनावर घाला। - विक १४ .
-
०वती स्त्री. सुवासिनी स्त्री .
Site Search
Input language: