-
स्त्री. १ तलवार , कोयता , विळी , चाकू इ० हत्यारांची तीक्ष्ण कड , तीक्ष्णपणा ; चौकोनी लांकूड इ० कांची सरळ कड . २ पर्वत , डोंगर इ० कांची माथ्यावरची अगदी उंच कडा . ३ ( ल . ) तीक्ष्ण , तल्लख , तापट , कडक स्वभावाचा माणूस . ४ डोंगराची रांग , ओळ . ५ क्षितिज ; क्षितिजाची काळी रेषा , दृष्टमर्यादा . दिवस धारेस आला .
-
स्त्री. १ जोराचा , वेगाचा ( नदी , इ० काचा ) प्रवाह . तो धारेमाजी निश्चिती । नाव गेली तेधवां । - ह ९ . २६९ . भोंवरे वळणे आणि धार । - दा ३ . ७ . ५२ . २ पाणी इ० पातळ पदार्थ वरुन पडत असतांना , पाऊस पडत असतांना , फुटक्या भांड्याच्या छिद्रांतून द्रवपदार्थ बाहेर पडतांना पाणी इ० चा दिसणारा दोरीसारखा आकार . ३ तेल , तूप इ० पातळ पदार्थ बाजरांत विकण्यास आल्यास त्यांतील काही भाग हक्क म्हणून घेण्याचा पाटील , कुलकर्णी इ० गांवकामगारांचा ( पूर्वीच्या काळी असलेला ) मान ; तेल , दूध वगैरे विकत घेतलं असतां पूर्ण माप झाल्यानंतर वर्तावळा म्हणून घ्यावयाचा थोडासा अंश . ४ धान्य उफणतांना जे हलके धान्य राशीच्या पलेकडे जाऊन पडते ते . ५ तेल , तूप इ० द्रवपदार्थाचा किंचित अंश . जसे - दह्याची कवडी , पाण्याचा थेंब ; तेलाची , तुपाची धार . ६ ( गाय , म्हैस जनावराचे ) दूध काढणे . धारेची वेळ झाली . [ सं . धारा ]
-
०करणे १ ( शस्त्र इ० कास ) धार लावणे , तीक्ष्ण करणे . २ शौर्याची कृत्ये करणे ; पराक्रम गाजविणे .
-
०उष्ण धारुष्ण धारोष्ण - वि . धार काढतांना ( दुधास ) असणारा उबटपणा ज्याचा निवाला नाही असे ताजे ( दूध ). असले दूध बलवर्धक व धातुपौष्टिक असते . जेवि श्वानचर्म पात्राप्रती । गोक्षीर भरिती धारोष्ण । - भाराबाल ११ . २८ . [ धारा + सं . उष्ण ]
Site Search
Input language: