-
स्त्री. १ प्रकार ; वर्ग ; कूळ . वंश याचे गाण्याची जात निराळी , त्याचे निराळी . २ जन्मस्वभाव . मूळस्वभाव , अंगचागुण तो अट सोडणार नाहीं त्याची जातच अशी . ३ चातुर्वर्ण्यांतील ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र या चार किंवा यांच्यांतील अनेक पोटजाती . जाति पहा . ४ रज : कण ; बिंदु ; तिळमात्र ( नकारार्थी उपयोग ). ( तुल० इं . जॉट ). त्याचे अंगीं शहाणपणाची जात नाहीं . - न . समुदाय ; जमाव ; समूह ; समुच्चय ; संघ . तैसा विषय जातांचा गरा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां । - ज्ञा १६ . ९० . नेहमीं समासांत उपयोग . याचीं उदाहरणें असंख्य आहेत जसें - वस्त्रजात = सर्व प्रकारचीं वस्त्रें ; वस्त्रांतील सर्वप्रकार , नमुने ; वस्त्र या नांवाखालीं येणारे सर्व ; याचप्रमाणें धातु - शब्द - गुण - अर्थ - द्रव्य - जात इ० . [ सं . जात ] ( वाप्र . ) जातीवर जाणें , जातीवर येणें - मूळस्वभावाप्रमाणें करणें ; स्वभावांत बदल न करणें ( निंदार्थी योजतात ) म्ह० १ जात बाटली म्हणून जात थोडीच बाटली . सामाशब्द -
-
स्त्री. स्वत : आतां मदार नाना यांचे जातीवर आहे . - ऐटी १ . २५ . [ अर . झात ] ( वाप्र्र . ) आपले जातीवर करणें , जातीवर करणें - स्वत : च्याच अकलेनें , शक्तीनें आणि साधनांनीं कोणतेंहि कृत्य करणें वडिलांचा पैका न वेचतां यानें आपले जातीवर लग्न केलें . जातीवर करणें , जातीवर घेणें , जातीवर देणें , जातीवर करणें , जातीवर भांडणें = स्वत : च्या शक्तीनें , सामर्थ्यानें करणें सामाशब्द -
-
क्रि.वि. गुणविशेषणाचे पूर्वी जोर येण्यासाठीं एक या शब्दासह लाविलेला उपसर्ग . जसें - एकजात पांढरा - पिवळा - मऊ = पूर्ण पांढरा पूर्ण पिवळा , पूर्ण मऊ . [ जात = कार ]
-
वि. उत्पन्न केलेला ; विशेषत : सामासांत उपयोग . उदा० वृक्ष - फल - जल - कमल - जात . लक्ष्मीपासून जात जो अभिभान तो दारिद्रयानें जातो . जेव्हां जा हें समासामध्यें दुसरें पद असतें तेव्हां त्याचा अर्थ - च्यापासून उत्पन्न झालेला , जन्मलेला असा होतो . परंतु जेव्हां पहिलें पद असतें तेव्हां - ला झालेला असा अर्थ होतो . जसें - पक्षी जातपक्ष झाले म्हणजे आईला सोडतात . याप्रमाणें जातक्रोध , जातकाम , जातलोभ = क्रोधानें , कामानें , लोभानें आविष्ट व क्रोधजात , कामजात , लोभजात = क्रोधापासून इ० झालेला . असे दोन्ही प्रकारचे समास वाटेल तितके होतात . जसें - जात - गर्भ - भोजन - अभ्यंग - संस्कार - आनंद - रोमांच - दु : ख - सुख . इ० .
Site Search
Input language: