-
पु. योध्दा ; लढवय्या ; शूर पुरुष ; उत्साही मनुष्य ( लढाईत , दुसर्याची आपत्ति दूर करण्यांत किंवा दान करण्यांत ). आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती । - ज्ञा १ . १०२ . २ नवरसांपैकीं एकः - उत्साह , शौर्य , पराक्रम दाखविणारा भाव . ३ ज्याचा कोणी पूर्वज लढाईत मेला असून , जो फाल्गुन वद्य प्रतिपदेचे दिवशीं , योध्दयाच्या समारंभानें देवदर्शनासाठीं जातो असा . ४ वरील मृत मनुष्याचा देवांमध्यें बसविलेला टांक . वीर बैसविला देव्हारां । - दावि ६३ . ५ मोठया मनुष्याची मरणोत्तर दशा . - बदलापूर ४९२ . ६ विशेषनाम , हुद्दा किंवा वर्णनपर नांव यांस जोडून येतो ; त्यावेळीं पुढारी , प्रमुख , श्रेष्ठ असा अर्थ होतो . उदा० रघुवीर ; कुरुवीर ; यदुवीर ; दैत्यवीर ; कपिवीर ; भक्तवीर ; वदान्यवीर इ० तैसा तुका वैष्णववीर । अवीट आवडी त्याची थोर । मोजुनि त्याहि कृष्णवीर । स्वहस्तें चौगुणें घेती वर . ७ एक पदवी . कोणतेही धाडस , उत्साह , औदार्य , परोपकार , जनकल्याण इ० गुणाविषयीं प्रसिध्द असलेल्या पुरुषास लावतात . उदा० वीर नरीमन , वीर वामनराव . - वि . १ शूर ; पराक्रमी . २ वैराग्यशील . [ सं . ] सामाशब्द -
-
स्त्री. १ ईर . शक्ति ; जोम ; रग ; ( ल . ) पर्वा ; भीडभाड . मराठे मनुष्य पळूं लागल्यावर कोणाची वीर कोणास नाहींशी होते - भाब ८४ . २ तेज ; गुण ; प्रभाव . ३ श्रेष्ठता ; उत्कृष्टपणा . ( बुध्दिबळें ) अधिकाराचें क्षेत्र , टापू . ३ ( बुध्दिबळें ) राजास बचावण्यासाठीं एखादें मोहरें मध्यें घालणे , मध्यें टाकणें . बुध्दिबळाच्या डावांत राजास शह देणारें मोहरें व राजा यामध्यें मोहरें टाकणें . ईर पहा .
-
०कंकण न. वीर पुरुषाचा मान म्हणून , पराक्रमाचें द्योतक असें मनगटांत घातलेलें कडें . वीर कंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं । - दा ७ . ९ . १५
-
०कन्या स्त्री. ( वीर पुरुषाची मुलगी ) युध्दप्रिय , धाडशी , खंबीर मनाची स्त्री . वीरभार्या , वीरपत्नी , वीर भगिनी हे समधर्मी शब्द होत . [ सं . ]
Site Search
Input language: