-
अ.क्रि. १ दमणे ; शिणणे ; भागणे ; थकवा येणे . २ शक्ति क्षीण होणे ; बेजार होणे ( म्हातारपण , रोग इ० कांमुळे ). ३ मति गुंग , कुंठित होणे . ४ दिवाळे निघणे ; पैसा नसल्यामुळे व्यापार थांबणे , चालेनासा होणे . ५ बुडणे ; उगवेनासे होणे ( कर्जाऊ दिलेली रक्कम , पैसे ). [ सं . स्थग ; प्रा . थक्क ; हिं . ]
-
०भागणे अक्रि . थकणे ; दमणे ; बेजार होणे . थकले कूळ न . दिवाळे वाजल्याने किंवा अतिशय गरीबीने कर्ज फेडण्यास असमर्थ असलेला मनुष्य , कुटुंब अथवा कूळ .
-
क्रि. ग्लानी येणे , गळणे , दमणे , भागणे , मरगळणे , शक्ती जाणे , शिणणे ;
-
क्रि. कर्जफेडीत दिरंगाई होणे , बुडणे ;
Site Search
Input language: