-
न. १ ज्याने खातां व बोलता येते तो शरीराचा अवयव ; मुख ; वदन ; तुंड . २ चेहरा ; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग . ३ ( सामा . ) ( एखाद्या वस्तूचा ) दर्शनी भाग ; पुढचा - अग्रभाग ; समोरील अंग . या ओझ्याच्या तोंडी मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत . ४ ( फोड , गळूं इ० कांचा ) छिद्र पाडावयाजोगा , छिद्रासारखा भाग ; व्रणाचे मुख . ६ ( एखाद्या विषयांत , शास्त्रांत , गांवांत , देशांत , घरांत ) शिरकाव होण्याचा मार्ग ; प्रवेशद्वार . ह्या घराचे तोंड उत्तरेस आहे . ७ ( ल . ) गुरुकिल्ली . उदा० एखाद्या प्रांताचे , देशाचे किल्ला हे तोंड होय . व्याकरण भाषेचे तोंड होय . ८ ( वारा इ० कांची ) दिशा ; बाजू . ९ धैर्य ; दम ; उमेद ; एखादे कार्य करण्याविषयीची न्यायतः योग्यता . १० एखाद्या पदार्थाचे ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कार्याकडे विनियोग इ० कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करितात तो भाग . भाकरीस जिकडून म्हटले तिकडून तोंड आहे . ११ ( युद्ध , वादविवाद इ० कांसारख्या गोष्टींची ) प्रारंभदशा . वादास आतां कुठे तोंड लागले . १२ ( सोनारी धंदा ) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो . याने ठोकलेला जिन्नस देतांनां तिची टोके जेथे जुळतात तो भाग . १४ . ( बुद्धिबळे ) डाव सुरु करण्याचा प्रकार ; मोहरा . वजीराच्या प्याद्याचे तोंड . [ सं . तुंड ; प्रा . तोंड ] ( वाप्र . )
-
०आटोपणे सांभाळणे आवरणे - जपून बोलणे ; बोलण्याला आळा घालणे ; अमर्याद भाषण , अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणे .
-
०आणणे ( आट्यापाट्यांचा खेळ ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हा एक एक खेळत येणे ; पाणी आणणे ; लोण आणणे .
-
०आंबट करणे - ( एखाद्याने ) असंतुष्ट , निराशायुक्त मुद्रा धारण करणे .
Site Search
Input language: