-
f Happy state of life. Stop. Continuance in the right way. An institution.
-
संस्था [saṃsthā] 1 Ā.
-
स्त्री. १ यथास्थित स्थिति ; स्वास्थ्य ; सुखावह स्थिति ; स्थिति ; स्थान . पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरत असतांहि तिची आकाशांतील संस्था बदललेली दिसत नाहीं . - मराठी सहावें पुस्तक पृ . ३१९ . २ शेवट ; अंत ; अखेरी ; समाप्ति . ३ थांबणें ; राहणें ; वास . ४ ऋजुमार्गानें गमन ; सुरळीत चालणें ; सरळपणाचा व्यवसाय ; सुसूत्र चालणें . ५ रचना ; घडामोड ; व्यवस्था . जैं सृष्टयादि संस्था । ब्रहम्यानें केली । - ज्ञा ३ . ८५ . ते सांख्य कर्मसंस्था । जाणती केंवी । - ज्ञा ५ . २६ . ६ घटना ; योजना ; कार्यनियुक्त मंडळी ; कार्यार्थ केलेली मांडणी ; उद्योग ; सभा . ( इं . ) कॉर्पोरेशन . [ सं . सम् + स्था ] संस्थापक - वि . स्थापना करणारा ; योजक ; सुरू करणारा ; प्रवर्तक . संस्थापणें - उक्रि . १ स्थापना करणें ; योजणें ; सुरू करणें ; घटना करणें ; घडवून आणणें . २ निश्चित करून स्थापन करणें ; ठरविणें ( धर्म , विधि ). ३ अधिष्ठित , स्थाननिष्ठ करणें ; सुरू , चालू करणें ( राजा , मूर्ति , धर्म , विधि वगैरेचे ). संस्थापित - धावि . योजलेलें ; निश्चित केलेलें ; ठरविलेलें ; स्थापन केलेलें ; रूढ केलेलें ; मान्य करून घेतलेलें . संस्थित - धावि . १ निश्चित ; स्थापित ; समाप्त ; पूर्णतेस नेलेलें ; प्रतिष्ठित ; निर्णीत . २ राहिलेलें ; निविष्ट आलेलें ; आश्रित ( सह , आंत , युक्त वगैरे ). संस्थिति - स्त्री . १ पूर्णावस्था ; शेवट ; अखेर ; पूर्णता ; निर्णय . २ वास ; कायमस्थान ; युक्तता . ३ टिकाव ; स्थिरता ; एकाग्रता .
-
saṃsthā f S Comfortableness of condition and circumstances; happy or easy state of life. 2 Stop, termination, cessation, conclusion, end. 3 Stopping, stay, tarrying. 4 Continuance in the right way; perseverance in rectitude.
Site Search
Input language: