-
पु. १ काठी , सोडगा यानें दिलेला मार . २ सतारीच्या तारेवर केलेला नखीचा आघात . [ घ्व . हिं . ठोक ; का . टोकु ]
-
पु. ( व . ) हंगाम ; मोसम ; वत्तर . या मुहूर्ताला लग्नाचा ठोक भारी आहे .
-
वि. १ जाड ; भरींव ; जड ; ठळक ; भक्कम . ( धातूंचीं भांडीं , दागिने ). २ ( ल . ) श्रेष्ठ ; प्रसिध्द ; चोख . ( शिक्षण , शहाणपण , धन इ० मध्यें ). ३ पूर्ण ; फुटकळ नसलेलें ; सर्व ( नंबर , संख्या ); सर्वसहित ; समुदायानें ; मोठया प्रमाणांत ; घाऊक ; ठोकळ ; एकदम जमेस धरलेलें ( रकम , बेरीज , माल , सौदा , खरेदी इ० ). हिशेब ठोक समजा हो । - दावि २४२ . ठोकबंद - वि . घाऊक ; एकदम ; सर्व . ठोक विक्री , ठोक विकरी - स्त्री . घाऊक विक्री ; सट्टयानें किंवा एकदम विक्री . याच्या उलट किरकोळ विक्री .
-
वि. घाऊक , ठोकळ . मोठया प्रमाणात ;
Site Search
Input language: