-
न. १ एक भयंकर मारक द्रव्य ; जहर ; वीख . याचे नऊ प्रकार मानतात ते - कालकूट , हलाहल ; सौराष्ट्रिक , ब्रह्मपुत्र , प्रदीपन , काकोल ( शृंगक ), वत्सनाभ ( बचनाग ), शौक्तिकेय , ( सक्तुक ), दारद ( हरिद्र ). तसेच याचे स्थावर व जंगम असे भेद आहेत . २ ( ल . ) अत्यंत कडू पदार्थ ; घातक , मारक , बाधक अहितकारक पदार्थ . ३ ( ल . ) ज्यापासून अपाय , घात होण्याचा संभव आहे असें द्रव्य , संपत्ति वगैरे पदार्थ . [ सं . विष् = पसरणें ] विष मानणें - अत्यंत तिरस्कार , तिटकारा करणें . विषाची परीक्षा पाहणें - एखादा भयंकर प्रयोग , साहस , धाडस करणें . सामाशब्द -
-
०कंठ पु. शिव ; शंकर . [ सं . विष + कंठ ]
-
०घटी स्त्रीअव . ( ज्यो . ) नक्षत्रांच्या अशुभ मानलेल्या चार घटिका . घ्न - वि . विषमारक ; विषनाशक ; विषहारक ; विष उतरणारें .
-
०द वि. विष देणारा .
Site Search
Input language: