|
वि. १ पाच , शेवाळ , कोंवळें गवत इ० च्या रंगाचा . २ ( ल . ) कच्चा ; अपक्व ; अपुरा शिजलेला ( फळ , अन्न , रसायन , वीट ). ३ कोती ( समजूत , विचार ). ४ अपक्व वासाचा ; कच्च्या रुचीचा . ५ ( सांके . ) भांग , गांजा किंवा तो ओंढणारा इसम . ६ भांडखोर ; ज्याचें कोणाशींहि पटत नाहीं असा ; हिरवट . [ सं . हरित ] ०एरंड पु. एरंडाची एक जात . ०कंच ०गार ०चार वि. अतिशय हिरवा ; गर्द हिरवा . ०कच्चा वि. १ अर्धवट पिकलेलें ( फळ इ० ). २ अर्धवट शिजलेलें , भाजलेलें . ( अन्न इ० ). ३ अर्धवट केलेलें ( काम ). ०चांपा चांफा - पु . एक फूलझाड . याच्या उलट पांढरा , पिवळा चांपा . ०निळा पिवळा - वि . काळानिळा ( राग , मत्सर , विष इ० मुळें झालेला - चेहरा , मुद्रा ). ०भाजला सदानकदा , कांहींहि झालें तरी अतिशय छळणें , त्रास देणें . हिरवट - वि . १ साधारण किंचित् हिरवा . २ किंचित् अपक्व ; कच्चा . ३ तंबाखूसह गांजा ओढणारा . ४ ( ल . ) अडाणी ; अशिक्षित ; रानवट . ५ अविचारी ; तापट ; एककल्ली ; चिडखोर ; तिरसट . मृत्यू ऐसा व्याघ्र । मुख पसरोनि समोर । तेथें हिरवटाचार । देहधेनूतें केंवि रुचे । - मुरंशु २८२ . हिरवटाण - स्त्री . हिरवा चारा , फळ इ० ची घाण ; हिरवा असल्याची घाण . [ हिरवट + घाण ] हिरवंडा - वि . १ हिरवट . अर्थ २ पहा . २ हिरवट घाण येणारें , हिरवट असलेलें ( फळ , वीट इ० ). हिरवस - वि . हिरवंडा . हिरवसान - पु . ( गो . ) हिरवटपणा ; कच्चेपणा . हिरवळ , हिरवाळ , हिरावळ - स्त्री . ओलें , हिरवेंगार गवत , वनस्पति इ० चा समुदाय . सडकून पर्जन्य पडला म्हणजे आठा दिवसांत चोहींकडे हिरवळ होत्ये . हिरवळणें - अक्रि . हिरवा पाला फुटणें पाल्हेजणें . वाळले काष्ठ हिरवळेना । - दा ९ . ७ . २९ . हिरवा घेवडी - स्त्री . हिरव्या शेंगा येणारी घेवडयाची वेल . हिरवीजमीन - स्त्री . ( कों . ) जमीन प्रथम माजल्याशिवाय , दाढ केल्याशिवाय जीत पेरणी केली आहे अशी जमीन . हिरवी तमाखू - स्त्री . ( सांके . ) गांजा . हिरवें - न . गुरांना खाण्यास उपयोगी असें हिरवे गवत , पाला इ० हिरवळ . खाणें सदानकदा , कांहींहि झालें तरी अतिशय छळणें , त्रास देणें . हिरवट - वि . १ साधारण किंचित् हिरवा . २ किंचित् अपक्व ; कच्चा . ३ तंबाखूसह गांजा ओढणारा . ४ ( ल . ) अडाणी ; अशिक्षित ; रानवट . ५ अविचारी ; तापट ; एककल्ली ; चिडखोर ; तिरसट . मृत्यू ऐसा व्याघ्र । मुख पसरोनि समोर । तेथें हिरवटाचार । देहधेनूतें केंवि रुचे । - मुरंशु २८२ . हिरवटाण - स्त्री . हिरवा चारा , फळ इ० ची घाण ; हिरवा असल्याची घाण . [ हिरवट + घाण ] हिरवंडा - वि . १ हिरवट . अर्थ २ पहा . २ हिरवट घाण येणारें , हिरवट असलेलें ( फळ , वीट इ० ). हिरवस - वि . हिरवंडा . हिरवसान - पु . ( गो . ) हिरवटपणा ; कच्चेपणा . हिरवळ , हिरवाळ , हिरावळ - स्त्री . ओलें , हिरवेंगार गवत , वनस्पति इ० चा समुदाय . सडकून पर्जन्य पडला म्हणजे आठा दिवसांत चोहींकडे हिरवळ होत्ये . हिरवळणें - अक्रि . हिरवा पाला फुटणें पाल्हेजणें . वाळले काष्ठ हिरवळेना । - दा ९ . ७ . २९ . हिरवा घेवडी - स्त्री . हिरव्या शेंगा येणारी घेवडयाची वेल . हिरवीजमीन - स्त्री . ( कों . ) जमीन प्रथम माजल्याशिवाय , दाढ केल्याशिवाय जीत पेरणी केली आहे अशी जमीन . हिरवी तमाखू - स्त्री . ( सांके . ) गांजा . हिरवें - न . गुरांना खाण्यास उपयोगी असें हिरवे गवत , पाला इ० हिरवळ .
|