Dictionaries | References

हळदळ

   
Script: Devanagari
See also:  हळहळ , हळहाळ

हळदळ     

 स्त्री. १ हुरहुर ; चित्ताची अस्वस्थता ; अस्वास्थ्य ; मोठी काळजी ( शारिरीक , मानसिक ). ( क्रि० लागणें , वाटणें ; करणें ). न हीं भक्तीचें बळ । तंववरी हळहळरे हळहळरे । २ खेद ; पश्चाताप . ( क्रि० लागणें ; करणें ). ३ चिंता ; त्रास ; दगदग . [ सं . हलहल किंवा हरहर ! ]
०खळबळ  स्त्री. चिंता आणि त्रास ; हळहळ पहा . हळहळणें - अक्रि . हुरहुर वाटणें ; खेद , शोक करणें ; त्रस्त असणें . हळहळाट - पु . हाहाःकार ; थयथयाट . अस्त्रें नोहे प्रळय अचाट । कीं प्रळयरुदाचा हळहळाट । - नव ४ . ८१ . हळहळीचा माल - पु . विकणारास फार मनस्ताप देणारा पीडादायक माल . हळहळीत - वि . अस्वस्थ ; चिंताग्र्स्त ; त्रस्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP