-
स्त्री. दुंधात गव्हले , तांदुळ , साखर इ० घालुन आटवुन केलेले पक्कान्न ; गोमंतकांत रताळ्याचें तुकडे , तांदुळांचे पीठ , गुळ इ० पदार्थ खिरींत घालतात . खिरींचे प्रकार - गव्हल्यांची , फणील्यांची , नखोल्यांची , मालत्यांची , बोटव्यांची इ० ( सं . क्षीर ; प्रा . खीर ; सीगन खील ; सिं . खीरु ; पं . हिं . गु . खीर ; ओरि . खोरी ( वाप्र ) खिरींत तूप पडणें - चांगल्या पदार्थांशीं दुसर्य़ा चांगल्या पदार्थाचा संयोग होणें . , म्ह० १ पोर पोटांत खीर तांटात - मुल होण्यापुर्वीच त्याच्या उष्टावणाची तयारी ; यावरुन ( ल .) अतिशय उतावळेपणा . २ जेथें खीर खाल्ली तेथें राख खाली काय ? = जेथें फुलें बेचली तेथें गवर्या वेचाव्या काय ? सामशब्द - खिरींत सराटा - पु . चांगल्या माणसांतील वाईट माणुस ; समाजांतील त्रासदायक माणुस ; समाजकंटक ; उपाधि ; व्याद ; कांटा ; ( बायकी भाषा ) विरुप माणुस ; चांगल्या नाजुकक वस्तुंतील वाईट व भासाडी वस्तु ; एकचित्त मंडळींतील प्रतिकुल वस्तुतील वाईट व भसाडी वस्तु ; एकचित्त मडंळींतील प्रतिकुल व्यक्ति . खिरींत हिंग - पु . चांगल्या मनुष्यांतील , वस्तुंमधील वाईट माणुस . वस्तु .
-
खिरतुपडी खाणें
-
f A dish composed of rice, milk, sugar, &c.
-
noun गोडाच्या मेलांत वा उसाच्या रोसांत शिजयिल्लें शीत
Ex. तो खीर आनी पुरयो खाता
Site Search
Input language: