Dictionaries | References ल लोहो Script: Devanagari See also: लोह Meaning Related Words लोहो A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . The word, although little used, differs not in sense from लाहो. लोहो Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Great fondness for, attachment to, desire after. लोहो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. लोभ ; स्नेह ; प्रेम ; आकर्षण ; लाहो . ( देवीचा गोंधळ घालतांना व पुढील म्हणीतच या शब्दाचा उपयोग होतो . इतर ठिकाणी सहसा येत नाही . ) [ सं . लोभ ] म्ह० देखला गोहो लागला लोहो . = लग्न होतांच किंवा नवर्याची गांठ पडतांच अल्लड मुलगी त्यावर प्रेम करुं लागली ( घराचा व आईबापांचा विसर पडला ). न. लोखंड .लोखंडाचे केकेले शस्त्र , तरवार इ० . लोहाचे काळवखे पडिले । फररां आकाशु गवसिले । - शिशु ५८५ .लोहभस्म ; लोखंडाच्या गंजापासून अगर किटापासून केलेले औषध .रक्त . राया राणिएंचा जाला । जरि घे लोहाचा कांटांळा । - शिशु ४७१ .सोने ; सुवर्णरुप धन . - वि .तांबडा .लोखंडी . [ सं . ]०कांत न. लोखंड आकर्षून घेणारा पदार्थविशेष ; लोहचुंबक .लोखंडाची एक जात .ह्या जातीच्या लोखंडाचे औषधार्थ केलेले भस्म ; तिख्याचे भस्म .०कार पु. लोहार ; लोखंडाचे पदार्थ बनविणारा . [ सं . ]०किट्ट न. लोखंडावरचा गंज ; जळलेले लोखंड .मंडूर नांवाचे औषधी द्रव्य . [ सं . ]०घंगाळ न. मोठे लोखंडी घंगाळ ; काहील . सूर्यनारायण जेवावयास आले , साती दरवाजे उघडले , लोह घंगाळे पाणी तापविले । - आदित्यराणूबाईंची कहाणी - कहाण्या भाग १ . पृ . ९ .०चुंबक पु. लोखंडाच्या वस्तूला आकर्षण करणारा दगड ; लोहकांत . - वि . ( ल . ) हट्ट घेऊन बसणारा ; अनेक युक्त्या करणारा किंवा धरणे धरुन बसणारा ; झटून , चिकटून दुसर्यापासून द्रव्य घेतल्याशिवाय न सोडणारा माणूस . [ सं . ]०चुंबकाकर्षण न. एका लोहचुंबकाचे दक्षिण टोंक दुसर्या लोहचुंबकाच्या उत्तर टोंकाजवळ आणिले असतां त्यां मधील दिसून येणारे परस्पर आकर्षण .०चुंबकप्रतिसारण न. दोन लोहचुंबकाच्या उत्तर किंवा दक्षिण टोंकामधील परस्परांस दूर लोटणे .०चूर्ण न. लोखंडाचा कीस .०तुला ळा स्त्री .लोखंडाची तागडी ; लोखंडी तराजू .लोखंडी गज , दांडा०दंड पु. लोखंडी गदा ; पातकी लोकांना मारण्याची यमाची गदा - हत्यार .यम , शनि यांच्या शांतीसाठी ब्राह्मणाला दान द्यावयाचा लोखंडी सोटा ; गज ; लोखंडी काठी . [ सं . ]०दंडक्षेत्र न. विना . पंढरपूर . शोधीत शोधीत ऋषीकेशी । आला लोहदंड क्षेत्रासी । दिंडीरवन म्हणती त्यासी । तेथे द्वारकावासी प्रवेशला । - ह ३६ . १८० .०धुरोळा पु. लोखंडाचा - लोखंडासारखा धुरळा - धूळ ; तांबडी धूळ . रणी उठिला लोहधुरोळा । तेथे चालो न शके वारा । - एरुस्व ९ . ३७ . [ सं . लोह + धुलि ]०परिघ पु. लोखंडी गदा - सोटा ; लोखंडी पहार . जे वनिता असे जारीण । तीस यमदूत नेती धरुन । लोहपरिघ तप्त करुन कामागारी दाटिती ।०पेटि का स्त्री . लोखंडाची पेटी ; तिजोरी ; ( इं . ) सेफ . सरकारी ब्यांकेसारखी सुरक्षित लोहपेटिकाच नाही . - आगर ३ . ६६ .०बंद पु. लोखंडाची सांखळी . दोही बाही कुंजरथाट । मद गाळित गजघंट । दाती लोहबंद तिखट । वीर सुभट वळंघले । - एरुस्व ८ . १६ .०बंद ध वि . सोनेरी . - शर०भस्म मंडूर नपु . लोखंडाच्या गंजापासून केलेले एक रसायन ; लोखंडाचे प्राणिद .०मय वि. लोखंडाचा बनविलेला ; लोखंडी ; लोखंड असलेला ; लोहनिर्मित .( ल . ) भयंकर ; क्रूर ; निर्घृण . [ सं . ]०मार्ग पु. लोखंडी रस्ता ; रेलवे ; आगगाडीचा रुळांचा मार्ग . सरकारने लोहमार्ग हिंदुस्थानांत केले ते आपल्या सोईसाठी आहेत . - टि १ . ३३ .०लंगर पु. लोखंडी बेड्या ; सांखळदंड . लोहोलंगर पायांत खिळविले । - ऐपो २०९ .०शलाका स्त्री. लोखंडाची सळई . लोहंगी , लोहांगी , लव्हांगी , लोहंगी काठी स्त्री . लोखंडाचे खिळे आणि कड्या जागोजाग बसवून मारामारीसाठी केलेला सोटा ; पहार . [ लोह + अंग ] लोहिवी स्त्री . तांबूसपणा . पुढां उपरति रागे लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । लाहलाहात नित्य नवी । वाढतीची असे । - ज्ञा १५ . १९४ . लोहार पु . लोखंडाचे खिळे , कोयते इ० अनेक पदार्थ करणारा कारागीर . [ सं . लोहकार ] लोहार काम न . लोखंडाच्या अनेक वस्तू करण्याचे काम ; लोहाराचे योग्य कर्म . लोहारकी स्त्री . लोहाराचा धंदा . लोहारडा पु . ( निंदेने किंवा कुत्सितपणे ) लोहार . लोहारसाळ स्त्री .लोखंडी कामाचा कारखाना ; लोहाराची काम करण्याची जागा . लोहारसाळेंतून खुरप्याला पाणी पाजून आण .लोहाराची भट्टी [ सं . लोहकार + शाला ] लोहें - स्त्री . पेटी ; तिजोरी . जैसी लोभियाचे हाती । सांपडे अवचिती धनलोहे । - एभा ७ . ५७० . लोहो आर्गळा - स्त्री . लोखंडाचा अडसर . कपाटे लोहो आर्गळा पंथ मोठे । - राक १ . २ . [ सं . लोह + अर्गळा ] लोहोदक - न . ज्यांत लोखंडाचा अंश आहे असे पाणी . [ लोह + उदक ] लोहोलोखंड - न . लोखंडाची भांडी , हत्यारे इ० वस्तू . [ लोह + लोखंड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP