Dictionaries | References

लांचावणे

   
Script: Devanagari
See also:  लांचाविणे

लांचावणे     

अ.क्रि.  
उ.क्रि.  
संवकणे ; कोणेक गोष्टीपासून एकवार लाभ झाल्यामुळे तीच गोष्ट पुनःपुनः करण्याविषयी संवकणे ; लाडावणे ; लालचावणे ; चटक लागणे ( विशेषतः वाईट अर्थी ). मग संवादु तोही पारुखे । तरी भोगितां भोगणे थोके । हे कां साहावेल सुखे । लांचावलेया । - ज्ञा १८ . ८२ . - एभा १ . २९२ . - तुगा ६ .
लांच देणे ;
आमिष दाखवून वश करणे ; फितविणे . नां तरि मेघमंडळे । काई चातक लांचाविले । - भाए १५ ; - मोकृष्ण ५८ . १८ .
पैसे खाण्याची वाईट संवय लागणे .
मोहविणे ; लुब्ध करणे . प्रगटुनी गुण गोड । रसिकांस लाचवा । - मोरा [ लांच ] लांचुगा - वि . लांचखाऊ ; लांच खाणारा . लचुंगी बुद्धी सदा देवांसी । तैशी नाही तुम्हां सांधूंसी । - एभा २ . ६४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP