Dictionaries | References

लडफड

   
Script: Devanagari
See also:  लडबड

लडफड     

 स्त्री. 
लटलट होणे ; ढिलाई ; शिथिल झालेली स्थिति ; फडफडत इतस्ततः झोळकंबणे ; लोंबणे ( यंत्र , एखादी रचना , कपडे इ० चे ).
लवलवीतपणा ; शैथिल्य ; बलहानि ( अंगाची ).
व्यग्रता व क्षुब्धता ( जीवाची ).
घोंटाळा ; विस्कळित स्थिति ( संसाराची , जिंदगीची , हिशेबाची , मसलतीची ).
लुडबुड पहा . - क्रिवि .
ढिलेपणाने ; शैथिल्याने ; लटपटां ; फडफडत इ० बडबड ( - नाम ) पहा . ( क्रि० चालणे ; धावणे ; बोलणे ; जेवणे ; नेसणे ; करणे ). [ ध्व . ] म्ह० द्राविडो लडबडाम्यहं = इकडून तिकडे व तिकडून इकडे विनाकारण लुडबुडणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP