|
पु. सोटा ; सोडगा ; जाड काठी . ओबड - धोबड जळणाचे लाकूड ; ओंडके . - वि . विलक्षण मोठा ; भक्कम ; जाड ; धसाडा ( मनुष्य , अवयव , दागिना , दोर , दोरी इ० ). स्थूल ; फोपशा . [ हिं . ] सामाशब्द - ०निरंजन लठ्ठभारती लठ्ठंभारती - पु . ( मूळ गोसाव्या संबंधी रुढ . ) शरीराने धष्टपुष्ट , दांडगा मनुष्य . ( विशेषतः निरक्षर व आडाणी ). - वि . धष्टपुष्ट . बेफिकीर . दांडगा . मूर्ख . लठ्ठा - पु . ( व . ) मोठा ; सोडगा ; लठ्ठा , लठ्ठू , लठ्ठ्या - वि . अजस्त्र ; अमर्याद मोठा ; भक्कम ; जाड ; भसाडा ( मनुष्य , पशु , वस्त्र , भांडे , जिन्नस ). लठ्ठ पहा . लठ्ठाई - स्त्री . दांडगाई ; जनावराप्रमाणे धुडगूस ; लढाई ; लठ्ठामिश्र , लठ्ठाश्रम , लठ्ठूबगाड्या , लठ्ठेश्वर - पु . लठ्ठनिरंजन पहा . लठ्ठामिश्रई - स्त्री . उर्मटपणाचे वर्तन ; दांडगाई . लठ्ठालठ्ठी . [ मिश्र = मैथिली ब्राह्मणाची पदवी ] लठ्ठालठ्ठी - स्त्री . सोटे , दांडकी इ० कांनी परस्परांमध्ये चालणारी मारामारी ; ( सामा . ) भांडण ; हमरीतुमरी . आम्हां लोकांत एकी तरी इतकी यत्किंचित लाभ होण्याचा सुमार दिसूं लागला न लागला तो लठ्ठालठ्ठी सुरु व्हावयाची ! - के . लठ्ठाश्रम - मी - पु . ढोंगी , दांभिक , धटिंगण असा जोगी . लोठाश्रम पहा . लठ्ठश्रमाच्या लागून पायी । विघ्न आणिले राज्यांत । - नव १८ . ३५ . [ लठ्ठ + आश्रमी ] लठ्ठेश्वर - लठ्ठनिरंजन पहा . लठ्ठ्या - पु . ( बायकी ) दांडगा , स्वैर , मोकाट माणूस . लठ्ठा पहा . एखाद्या स्त्रीने ठेवलेला माणूस ; जार .
|