Dictionaries | References

लटकी

   
Script: Devanagari
See also:  लटका

लटकी     

वि.  
खोटा ; खरा नसलेला ; वस्तुस्थितीच्या विरुद्ध ; असत्य . पण करिति मदुक्ती काय लटकी ही । - मोसभा ५ . ३३ .
खोटा ; लबाड ; विश्वासघातकी ; अप्रामाणिक ; लुच्चा .
व्यर्थ ; रिकामा ; निष्फळ . गेलो खरा पर काम झाले नाही . लटकी खेप मात्र पडली .
अन्याय्य ; वृथा ; अयुक्त ; असमर्पक . मी कांही अपराध केला नसतां मला लटक्या शिव्या कां देतां ?
अधु ; व्यंगयुक्त ( अवयव , इंद्रिय इ० ). लटकापर नेटका - खोटा पण चांगला दिसणारा ; दिखाऊ ; दर्शनी ; चांगला . सामाशब्द -
०ताठा  पु. रिकामा दिमाख , डौल . म्ह० नाकांत नाही काटा आणि लटका ताठा .
०फटका   बिटका लांडा वि . खोटा ; विश्वासघातकी ; अप्राणिक ; लुच्चा . [ लटका द्वि . ] लटकारा , लटकोरा वि . खोटा ; लबाड . [ लटका ] लटकेपण न . लबाडी ; खोटेपण . लटिका , लटीक वि . ( विशेषतः काव्यांत ) खोटा . लटका पहा . ; लटिके हे तुम्हां वाटेल खेळणे । एका कृष्णाविणे अवघेचि । - तुगा २३ . - मोसभा ५ . ७३ . लटीकवाद पु . ( राजा . ) खोटे सांगणे , बोलणे ; खोटे बोलण्याचा दोष , पाप्र . देतो म्हणून बोललो आतां जर न दिल्हे तर मजकडे लटीकवाद येईल . लटिकेपण पणा नपु . खोटेपणा . ईश्वरवाक्य वृथा गेले । आजि देवासि आले लटिकेपण । - कथा १ . ४ . ९५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP