Dictionaries | References

मारा

   
Script: Devanagari

मारा     

verb  माइ बायदिफोरनि देन्थानिफ्रा बेगर दिहुननाय खामानि जेराव बेगरफोरा सिरिनानै थायो   Ex. मुजिराफोरा मारा होगासिनो दं
HYPERNYMY:
साखोन खालाम
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
मारोन
Wordnet:
asmমৰণা মৰা
benঝাড়া
gujઝૂડવું
kanಕಾಳು ಉದುರಿಸು
kasچھۄمبُن
oriବାଡ଼େଇବା
panਝਾੜਨਾ
urdگاہنا , مسلنا , روندنا

मारा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जिस पर मार पड़ी हो   Ex. थप्पड़ मारे गाल पर पाँचों उँगलियों के निशान दिख रहे हैं ।
MODIFIES NOUN:
पदार्थ
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
adjective  जो किसी प्रकार के आघात या प्रकोप से त्रस्त या पीड़ित हो   Ex. किस्मत के मारे भिखारी की आज लॉटरी निकल गई ।
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
See : मारा हुआ

मारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. माऱ्याचे आंत येणें To come within fire.

मारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An attack; a line of fire; a sweep; beating.

मारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सतत मारण्याची क्रिया   Ex. नुसत्या पाण्याचा मारा केल्यासही कीड निघून जाते.

मारा     

 पु. 
( किल्ला इ० कांवर केलेला हल्ला ; तोफांच्या गोळ्यांचा वर्षाव ; मार . किल्ल्याच्या पूर्व बाजूनेंच मारा केल्यामुळें यश आलें .
तोफांची रांग .
नेमक्या ठिकाणीं गोळा लागू होण्याजोगें संधान . त्या मोरच्यानें मारा चांगला साधला . त्या किल्ल्यास दोन मारे आहेत . तिसरेकडून कोठून गोळा लागू व्हावयाचा नाहीं .
तोफेचा , बंदुकीचा , आटोका , पोंच ; टप्पा .
एखाद्या साथीच्या रोगानें , महापुरानें घेतलेला बळी . महामारीनें त्या गांवाचे दोन मारे घेतले . ही नदी प्रतिवर्षी एक मारा घेतें .
भडिमार ; मार ; माराचा विषय होणें ; मार बसणें . माझा चहूंकडून मारा होतो .
( किंवा मार ) चंगळ , विपुलता ( बर्‍या किंवा वाईट गोष्टीची ).
बुद्धिबळादि खेळांत एका किंवा अनेक घरांवर चालू शकणारी मोहर्‍याची मारक शक्ति .
वेढा ; लोंढा ; जोर ; सपाटा . पंधरा खेडीं पुराच्या मार्‍यांत सापडलीं . - के २६ . ७ . ३० . मार्‍याचे आंत येणें - माराच्या टप्प्यांत येणें . माराकुटी - स्त्री .
मारकूट ; मारपीट .
( सोंगट्यांचा खेळ ) मारामारी ( यांत कोणत्याहि खेळाडूनें दुसर्‍या कोणाचींहि नरद मारावयाची असते ). मारांडी - स्त्री . ( कु . ) कुचंबणा . मारामार , री - स्त्री .
परस्पर लढणें ; मारणें ; युद्ध ; लढाई .
( ल . ) अतिशय श्रम . ( उपजीविकेचीं साधनें इ० मिळविण्याकरितां केलेलें ). दिवसभर मारामार करावी तेव्हां कोठें दोन आणे हातीं येणार .
( अशिष्ट ) पराकाष्ठेचा झपाटा व गडबड ; गर्दी ( रोजच्या कामाची ).
पराकाष्ठेची विपुलता ( पदार्थांची . ) कामाची - गाण्याची - धावण्याची - प्रयोजनाची - मारामार .
पंचाईत , अडचण .
( कायदा ) दोन किंवा अधिक इसमांनीं सार्वजनिक जागीं केलेली झुंज . [ मारणें द्वि . ]
०पडणें   होणें - पंचाईत पडणें . पंचाईत होणें ; अडचण पडणें . गोर्‍यांना तेथें धान्य - पाणी मिळण्याची मारामार पडली . - के १७ . ४ . ३० . माराहाण - स्त्री . मारहाण . मारिजेसिल - क्रि . मारला जाशील . मारु - वि .
मारणारा .
मोहक ; नखरेबाज ; चित्ताकर्षक ; मनोहर ( डोळे , अलंकार इ० ).
भेदक ; बोंचणारें ; परुष ( भाषण ).
( गो . ) लबाड . मारुन - क्रिवि . आवेश , पूर्णपणा , विपुलता इ० दाखविणारें वाक्यालंकारभूत क्रियाविशेषण . मारुन तेल लाव आणि बळकट चोळ . आज मारुन हजारों रुपये धर्म केला . मारुन उरता ठेवणें - बेदम मारणें ; मरेमरे तों मार देणें . त्याला मारुन उरता ठेवला नाहीं . मारुन पीठ , पिठार करणें - ( एखाद्यास ) ठेचणें ; बदडणें ; बेफाम मारणें . मारुन भूस भरणें - अगदीं बेदम मार देणें , मरेमरे तों ठोकणें .
०मारुन   मारतां मोत भरणें - मारुन नरम आणणें , बेशुद्ध करणें ; बेदम मारणें . मारुन येवप - ( गो . ) मिरगी , झिट येणें . मारुन कुटून धमकून मुटकून - क्रिवि . नाना प्रकारच्या युक्त्या व प्रयत्न करुन ; जबरदस्तीनें ; जुलमानें ; पुष्कळ श्रमानें ; मोठ्या कष्टानें ; वारंवार प्रयत्न केल्यावर . ( क्रि० अळेबळे साधणें , करणें ). एकदां मारुन कुटून घर बांधलेसें केलें . [ मारणें + कुटणें ; मारणें + मुटकणें ] मारे - क्रिवि . ( वाक्यालंकारार्थी किंवा पादपूर्णार्थक शब्द ) आवेशानें . मार अर्थ ८ पहा . मारे मुसळाखालीं एकेकाची टाळकीं फोडून टाकीन . - नामना ८६ . मारेकरी - पु . एखाद्याच्या सांगीवरुन दग्यानें एखाद्यास ठार मारणारा ; वेतन घेऊन मनुष्यवधाचें काम करणारा . [ मारणें + करी ]

Related Words

मारा   मारा मारा फिरना   मारा फिरना   मारा ना   मारा करणारा   मारा हुआ   मारा हो   मारा घेणें   मारा जाना   मारा-मारी   thrash   thresh   गावहरग्रा   எறிகின்ற   గొడవపడే వాడు   ਸੁੱਟਣ ਵਾਲਾ   પ્રક્ષેપક   मारा भिणें भूत पळतें   शिंक्याला अंबाः खालीं मारा बोंबाः   নিক্ষেপক   ಕಾಳು ಉದುರಿಸು   आक्षेपक   दाइँ गर्नु   झोडपणे   प्रक्षेपक   چھۄمبُن   মৰণা মৰা   ଅମଳ କରିବା   ಫಿರಂಗಿ   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका   போரடி   నూర్చు   ઝૂડવું   માંડવું   ಹಿಕ್ಕು   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   माँड़ना   مُنُن   پھینکنے والا   ଆକ୍ଷେପକ   എറിയുന്ന   गाहना   মাড়াই করা   मळप   ਝਾੜਨਾ   മെതിക്കുക   मळणे   పరిశీలించు   fighting   combat   ବାଡ଼େଇବା   ঝাড়া   scrap   seed   fight   அடி   व्यर्थ घूमना फिरना   मारोन   फेकणारा   maar   bombardment   टांचरा   bombarding   तोफची   ससेहोलपट   ससेहोलपड   आमाला   उद्वासित   रोखमारा   कुवलयापीड़   अंजनपर्वन्   वरूषणें   वाघ डांभणें   शक्तिहस्त   अनिर्जित   आग पिणें   दीक्षायूप   थप्पड़   दंतक्रूर   दगड घेणें   दगड फेकणें   दगडमार करणें   दगड मारणें   दगड हातीं घेणें   ताड़का   टैक्सखोर   लाही फुटणें   भडिमार   भद्रविद   रेजगारी   भूतकर्मन   मार पडणें   पिंडसेक्तृ   सील्ला   सॅम   हृदोदर   शह देणें   आतषबाजी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP