Dictionaries | References

मंथणें

   
Script: Devanagari
See also:  मथणें

मंथणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To put to death.

मंथणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Churn. Fig. Discuss, Entice. Put to death.

मंथणें     

उ.क्रि.  
घुसळणें ; मंथन करणें . ना तरी शब्दब्रह्माब्धि । मथिलेगा व्यासबुद्धि । - ज्ञा १ . ५१ .
वादविवाद , चर्चा , वाटाघाट करणें .
छाननी . संशोधन , परीक्षण करणें .
एखाद्या गोष्टीविषयीं ( मनांत ) विचार , मनन , चिंतन करणें .
अनुकूल करुन घेणें ; वळविणें .
( काव्य ) ठार मारणें . श्वेतहयें अंबष्ट श्रुतायुनामा रणांगणीं मथिला । - मोकर्ण ३ . २५ .
पराभव करणें . तव बळ मथितो त्यातें मारुनि साधीं रणीं निज ***** । - मोकर्ण १२ . ३ .
घासणें ; मंथन करणें . जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । - ज्ञा १ . २४३ . [ सं . मंथन ] मंथणी , नी - स्त्री .
रवी ; घुसळणी .
मंथण्याची , घुसळण्याची क्रिया
सोनाराचें मणि तयार करण्याचें हत्यार . मथणी , नी - स्त्री . ताक करण्याचा डेरा ; माथणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP