Dictionaries | References

भरारुन

   
Script: Devanagari
See also:  भरार , भरारां

भरारुन     

क्रि.वि.  
झपाट्यानें जाण्याच्या , चालण्याच्या विशिष्ट ध्वनीच्या , तसेंच झपाट्याच्या विशिष्ट क्रियेच्या ( भरारणें , झटकणें , सोसाट्यानें वाहणें , फडफडवणें , थोपटणें इ० ) आवाजाचें अनुकरण होऊन . ( क्रि० उडणें ; उठणें ; पळणें ; निघणें ; सुटणें ; चालणें ; सुजणें ; फुगणें इ० ).
( ल . ) जलदीनें ; झपाट्यानें ; सपाट्यानें . [ ध्व . भर ! ] भरारणी - स्त्री . मोठ्यानें कडकड आवाज करुन जळणें इ० . भरारणें पहा . भरारणें - अक्रि .
झपाट्यानें भरभरणें
जलदीच्या हालचालीनें , भर्र असा आवाज करुन उडणें ; भरारी मारणें .
( ल . ) ( एखाद्या गोष्टीविषयीं ) उत्सुकतेनें व आवेशानें मागें लागणें ; नादीं लागणें ; हुरळणें .
भडाडणें ; पेटणें ( आग , गवत ); जोरानें वाहणें ( वारा ); रानोमाळ उडणें ( धूळ , धूर , भुकणी ); झपाट्यानें व रगडावून उठणें ( पुरळ ); फुगणें ; सुजणें ( फोड , गांठ ).
अतिशय तरारणें ; भरभरणें ( कामधंदा , व्यापार ); वाढणें ; वृद्धिंगत होणें . सौभाग्यश्री तुझी भरारो हे । - मोआदि १२ . २० . भरारुन या धातुसाधिताचा भरारच्या ऐवजीं पुष्कळंदा उपयोग करितात . भरारा - पु .
वेगानें , झपाट्यानें आणि उत्कंठेनें धांवणें , घुसणें ; हल्ला ; पाठलाग ; चाल ; अभिनिवेश .
सोसाटा . शिरीं उष्ण पाऊस वायू भरारा । - कचेसुच पृ . २ . भरारी - स्त्री .
भरकन उडणें ; उड्डाण ( पक्ष्यांचें ); अति त्वरेनें उंच किंवा दूर जाणें . ( क्रि० मारणें ).
 पु. ( सांकेतिक ) रघुनाथराव पेशवे . ( यांस त्यांच्या जलद रवार्‍यांवरुन राघो भरारी असें म्हणत . ) अटकेवर झेडें न्याया आणितां कुठून भरारी - यापुढें । - विक १० .
०मारणें   क्रि .
उडणें ; उड्डाण करणें .
जलदीनें प्रवास करणें .
( एखाद्या गोष्टीचा ) मधला भाग अजीबाद गाळून किंवा त्याकडे लक्ष्य न देतां एकदम पुढच्या भागावर जाणें ; उड्या मारणें . जी हकीकत घडली ती साद्यंत सांग भरार्‍या मारु नको .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP