Dictionaries | References ब बोभाणें Script: Devanagari See also: बोभाइणें Meaning Related Words बोभाणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To call loudly. Ex. ऊर्ध्व करूनिया हस्त ॥ दीर्घशब्दें बोभाती ॥. बोभाणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. ( काव्य ) मोठ्यानें हांक मारणें ; बोलावणें .ओरडणें ; ओरड करणें ; हाकाहाक करणें . आपले परावे कोणी नेणें भोंवतीं । त्यांच्या नांवें बोभे बोभे हा हो श्रीपति । - तुगा १३१ . कृष्णातें पार्थातें कर्णहत समस्त वीर बोभाती । - मोकर्ण ३९ ३५ . [ बाहणें ] बोभा - स्त्री . ( काव्य ) हांक . तुका म्हणे झालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा । - तुगा २०२ . बोभाट , टा - पु .प्रसिद्धि ; गवगवा ; बोलवा . ( गुप्त गोष्टीचा ).गर्जना ; घोष ; गजर . आंगेंसीं बोभाटु । सांडिती मेघ । - ज्ञा १८ . ७३४ .ओरड ; हाकाहाक ; हाकाटी . वाउगें बोभाट वर्माविण । - तुगा १४ .गार्हाणें ; कागाळी ; तक्रार . तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते । - केका ८६गांवगुंडकी . [ बोभ + आट प्रत्यय ] म्ह० काम थोडें बोभाट मोठा . बोभटणें - अक्रि .वाजणें ; गर्जणें ; गाजणें . रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें । - दा १ . २ . २३ .हांक मारणें ; बोलावणें ; ओरडणें . उंच स्वरें बोभाटत । - गुच १६ ६४ .बोभाटा होणें ; कुप्रसिद्धीस येणें ; बोलवा होणें . बोभावणें - अक्रि .( काव्य ) घुबडानें , कोल्ह्यानें आवाज करणें , ओरडणें , घुमणें ; कोल्हेकुई करणें . बोभाइणें पहा . राजमंदिरीं अमंगळ । दिवाभीत बोभावती ।मोठ्यानें ओरडणें ; हांक मारणें . ते वेळीं महाविष्णूतें । बोभाविलें आकान्तीं । - मुआदि ६ . २२ . बोभाविणें - अक्रि . ( काव्य ) मोठ्यानें ओरडून हांक मारणें . बोभाणें पहा . एकमेकांतें बोभाविति । Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP