Dictionaries | References

बुळबूळ

   
Script: Devanagari
See also:  बुळबुळ , बुळबुळां

बुळबूळ     

 स्त्री. 
बुळबुळीतपणा ; स्निग्धता ; ओशटपणा ; निसरडेंपणा .
गळती ; टपटप पडणें ; ठिबकणें ; पाझरणें ; थेंबथेंब पडणें . ( क्रि० लावणें ; मांडणें ; वाहणें ; लागणें ; सुटणें ; चालणें ; होणें ). बुळबुळ , ळां - क्रिवि . पावसाची बुरबुर , ( छपर , भांडें , दाण्याचें पोतें , नाक इ० च्या ) सारख्या गळण्यानें किंवा ठिबकण्यानें , जखमेंतील घाण पदार्थाच्या वाहाण्यानें , ढेकूण , ऊ , पिसू इ० च्या , अंगावरील वस्त्र इ० मध्यें होणार्‍या हालचालीनें होणार्‍या आवाजाचें अनुकरण होऊन . बुळबुळणें - अक्रि .
( केस , शरीर इ० मध्यें ) उवा , पिसवा इ० चा बुजबुजाट होणें .
( जखम , फळ इ० मध्यें ) कृमि वळवळत असणें . [ बुळ ! ] बुळबुळपंचांग - पु ( गो . ) अजागळ , बावटळ मनुष्य . बुळबुळाट , बुळबुटाण - पु . ( कु . ) बुळबुळीतपणा ; तेलकटपणा ; ओशटपणा . बुळबुळाविणें - सक्रि .
तेल , तूप इ० नीं बुळबुळीत करणें .
कसेंबसें धुणें , घासणें , विसळणें ( वस्त्र , अंग , भांडें ) [ बुळबुळ ] बुळबुळीत - न . तुळतुळीतपणा ; तेलकटपणा ; निसरडेपणा ; बुळबुळीतपणा . हाताचें बुळबुळीत अद्याप जात नाहीं . - वि
तेलकट ; चिकट ; तुळतुळीत .
निसरडा ; घसरडा .
गरीब ; भितरा ; शेळण्ट .
कमजोर ; नीरस ; पाणचट ( वर्तणूक , भाषण , लेख इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP