Dictionaries | References

बिदाकी

   
Script: Devanagari
See also:  बिदा , बिदाई , बिदागिरी , बिदागी , बिदायकी

बिदाकी     

 स्त्री. 
रवानगी ; पाठवणूक ; रवाना . ( क्रि० करणें ; घेणें ). तुम्हासही बेकैदी चालल्यान इजा द्यावी सबब आमच्या खावंदांनीं आम्हास रुमशामहून बिदा करुन पाठविलें . - वाब १६ .
निरोप देणें ; बोळवण . नारु बरे झाले म्हणजे तुझी बिदागी करुं . - पेदसभा ४ .
निर्यात ; बाहेर पाठविणें . येल्ची मजकुराची बिदा विलायतेस करणार . - दिमरा २ . ७९ .
निरोप देतांना , पाठवणी करतांना संभावना म्हणून दिलेलें पारितोषिक , देणगी , अहेर , बोळवणी . नंतर विडे देऊन बिदागिरी केली . - रा १२ . १९५ .
गुणिजनांना त्यांच्या गुणांची चहा करण्यासाठीं दिलेलें बक्षीस ; देणगी . [ अर . बिदाअ ] बिदा करणें -
पाठवणी , बोळवण करणें ; निरोप देणें .
काढून टाकणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP