|
क्रि.वि. सरबरीत पदार्थ ( दहीं , आंबरस , पू इ० ) ओततांना किंवा बाहेर पडतांना , ढिला अथवा फुटका मृदंग वाजवितांना , बदका मारतांना , पोकळ जमिनीवरुन चालतांना होणार्या आवाजाप्रमाणें आवाज होऊन ; धपांधप ; ( क्रि० वाजणें ; करणें ; पडणें ; मारणें ). बदबदणें - अक्रि . बदबद आवाज होणें ( फुटक्या नगार्याचा इ० ). पू इ० पिकणें ( उठाणूं , गांठ इ० तील ). पडशामुळें जड , भरलेलें , कोंदलेलें होणें ( डोकें , नाक इ० ). [ ध्व . ] बदबदीत - वि . बदबद आवाज करणारा ( फुटलेला मृदंग , भांडें इ० ).
|