Dictionaries | References

बजिद

   
Script: Devanagari
See also:  बजिद्द , बजीत , बजीद

बजिद     

वि.  
निकड लावणारा . सेवक खानाजवळ या गोष्टीकरितां नित्य वजीद आहेत . - रा १ . ३७ .
आग्रह करणारा ; हट्ट धरणारा . कळम्बचे मुक्कामीं उभयतांस बजीद झालों कीं चलावें . - रा ५ . १७ .
दीन ; श्रमी . वेढा पडला म्हणोन घाबरेपणें गळां पडोन बजीद व्हाल तर यांणीं किल्ल्याचें कांहींच करणें नाहीं . - ख १ . २१० .
रुष्ट . विदुर यांस वर्तमान खोटेसें समजल्यावर आपले जागां फार बजीद होऊन .... - ख १० . ५३२० .
जिंकलेला ; पराजित ; वश झालेला . [ सं . विजित ; फा . ब जिदद ] बजीत , बाजीत , होणें - आग्रह करणें ; कृपा भाकणें . बाजीद होऊन जमान देऊन . - भाद्विसंवृ ५० . बजिदगी , बजिदी , बजीदी - स्त्री .
अजिजि ; आर्जव . लाटसाहेब बहादुरानें तमाम बजिदगीनें लिहिलें - रा १० . २५२ . त्यांनीं वकील पाठवून बहुत बजिदी केली . - ख १००६ .
विनवणीचा आग्रह . सत्वर येणें येविसी बहुत बजीदी केली . - पेद १८ . ८८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP