|
पु. १ मागची बाजू ; पिच्छाडी . २ ( ल . ) दुजोरा ; मदत ; पाठबळ . ( क्रि० देणे ; एखाद्याचा दुमाला राखणे ; ठेवणे ; उचलणे ; संभाळणे ; पुरविणे ). ३ पाठलाग ; पिच्छा . पाखाड्यांनी पाठी पुरविला दुमाला । तेथे मी विठ्ठला काय बोलो । - तुगा ८९२ . एक ससा पैदा झाला त्याने कुतरियाचा दुमाला घेऊन कुतरा मारिला . - भाअ १८३४ . ४ रुंदी ; विस्तार ; भिंतीत झांकला जावयाचा भाग ; खोली ( चिरा , इमारतीचा दगड , तोड , फाड इ० कांसंबंधी ). दुमालदार पहा . डबर मिळतील तितके समचतुष्कोन चांगल्या दुमाल्याचे , उचलण्याजोगे असावे . - मॅरट २ . [ फा . दुम्बाला ] ( वाप्र . ) ०धरणे धरुन असणे - ( एखाद्याजवळ ) आश्रयार्थ , रक्षणार्थ येऊन राहाणे ; ( एखाद्याला ) चिटकून असणे . - ०पुरविणे मदत देणे ; साहाय्य करणे . ०सोडणे ( एखाद्यास दिलेला ) आश्रय काढून घेणे . दुमाल्यावर सोडणे ( एखाद्याच्या ) पाठीशी ( उत्तेजन , हुकूम , मदत देण्याकरितां ) असणे . - पाब १२ . दुमाल्यावर पाठविणे ( एखाद्याच्या ) पाठलागाकरितां पाठविणे . दुमाल्यास लावणे १ खाली लिहिणे ; जोडणे .
|