-
अ.क्रि. गांठणें ; पकडणें . ' भट गोसावी यांतें टाकींत जाति ; परि टाकतिनां ; '- लीच ३ पृ . ८४
-
स.क्रि.
- फेकणें ; उधळणें ; हरवणें ; पाडणें ; काढणें ; काढून टाकणें ; दूर करणें ; टोलावणें .
- सोडून देणें ; त्याग करणें ; अंगाबाहेर लोटणें ; स्वीकार न करणें ; ठेवणें ; घेऊन न जाणें ; वर्ज्य करणें .
- ( बिछाईत इ० ) पसरणें , घालणें .
- हवालीं करणें ; सोंपविणें अवलंबून ठेवणें ( उद्योग , ओझें , विश्वास ); दुसर्यावर विसंबणें ; दुसर्यासाठीं ठेवणें . हा त्याजवर टाकतो , तो त्याजवर , तो तिसर्यावर , या प्रमाणें ते कोलताहेत .
- पैज मारणें ; पणास लावणें .
- फेंकणें ; पेरणें ( बीं ); कणीस येणें ; कोंब येणें ; वर काढणें ; न घेणें ( थान ); भरधांव सोडणें ( घोडा ); हात टाकणें ; मारणें ; अंग ( मांस ) कृश , रोड होणें ; उडी घालणें . टाकूं या भितरीं अग्नीमाजी । - तुगा ११८.
- आकलन होणें ; आवांक्यांत येणें . तें माझिये अल्पमतिसि । केवी टांके । - स्त्रिपु २ . २८ . ३७ .
- मिळणें ; पावणें ; घडणें . टाकणें हें क्रियापद घालणें , ठेवणें या क्रियापदांप्रमाणें व्यापक अर्थानें तसेंच निरनिराळया प्रकारांनीं वापरण्यांत येतें . ठेवणें पहा . या टाकणें क्रियापदापूर्वी अनिश्चिततादर्शक प्रत्यय , ऊन प्रत्यय , भूतकालवाचक धातुसाधित असल्यास त्याचा अर्थ चालू असलेल्या गोष्टीची पूर्णता दर्शवितो . उदा० मारून टाकणें = ठार मारणें ; पाडून टाकणें = पार पाडणें ; सपशेल फेकणें . तसेंच खाऊन , देऊन टाकणें - लिहून - पिऊन टाकणें इ० . ( वाप्र . )
- ( एखाद्याशीं ) टाक टाकणें - स्पर्धा किंवा बरोबरी करणें .
- टाकणें टाकणें - औपचारिक ( मनापासून नव्हे अशी ) गोष्ट करणें ; फुकट नमस्कार करणें ; वरवरचा देखावा करणें ( बोलावणें , भेटणें इ० चा ); मान किंवा मैत्री नसेल तेथें कोरडा आदर करणें . मी भोजनास जात नाहीं हे त्याला ठाऊक आहे , परंतु तो उगीच टाकणें टाकायाला आला आहे . २ टाक टाकणें पहा .
- टाकला - निश्चित ; कायम ; हमखास . रोग्याला प्रात : काळीं टाकला उतार . या घोडयाचे टाकले शंभर रुपये येतील . हा टाकला कळवंतिणीचे घरीं असतो .
- टाकलेला - निश्चितपणें ; ठेवलेला ; खात्रीचा , खरोखर , अवश्य , नेहमीं , नियमित , ठेवलेला असा . डोंगरावर टाकलेला पाऊस असतो .
- टाकला रोजगार , उदीम , व्यापार - एखाद्यावर सोंपविलेला , लादलेला व्यापार इ० .
- टाकलें अन्न , जेवण - न . चुकतां मिळावयाचें जेवण .
- टाकली किंमत - आपण सांगितलेली व ताबडतोब मिळालेली किंमत .
- टाकली गांठ पडणें , भेट घेणें - खात्रीनें भेटणें ; जरूरीच्या कामासाठीं भेट घेणें .
- टाकून बोलणें - तिरस्कारानें , तोडून बोलणें , खरडपट्टी काढणें . [ सं . त्यज = सोडणें ]
-
स.क्रि. ( महानु . जुनें ) मिळविणें ; प्राप्त करणें ; जवळ करणें . ' कां ग्रीष्में दगधु । जेवि टाके गंगेचा र्हदु ' - ऋ १०६ . ' तया मज तो हा वाड्महापथु । केवि टाके । ' - ऋ ७ . तर्ही प्रेमाचा कडलगीं । टाकूनि कैवल्य दुर्ग । ' - उ . १६५ .
-
मोकळें होणें ; व्यवस्था करणें ; विकणें . [ हिं . टालना ; का . टलैसु = टाळणें ]
Site Search
Input language: