Dictionaries | References

डोहाळा

   
Script: Devanagari
See also:  डोहळणे , डोहळा

डोहाळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गर्भवती स्त्रीला खाण्यापिण्याविषयी होणार्‍या इच्छा   Ex. आईने तिचे सर्व डोहाळे पुरवले.
ONTOLOGY:
संवेग (emotion)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डोहळा दोहद
Wordnet:
hinदोहद
kanಇಚ್ಚೆ ಬಯಕೆ
kokदुवाळो

डोहाळा     

 पु. १ गर्भवती स्त्रीची वासना ; इच्छा . वसिष्ठ म्हणे रायासी । धर्ममर्यादा आहे ऐसी । डोहळे पुसावे स्त्रियांसी । मांगती त्यांसी ते द्यावे । - भारा - बाल ४ . ३४ . २ अयोग्य इच्छा ; भलत्या गोष्टीवर वासना जाणे ; छंद ; हौस ; शोक . ( क्रि० पुरणे ; पुरविणे ). कैसे प्राप्तिचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । - ज्ञा ६ . ७३ . [ सं . दोहद ; प्रा . डोहला ] भिकेचा डोहळा आठविणे - ज्यामुळे भीक मागावी लागेल असे ढंग व्यक्त करणे ; व्यसनापायी उधळेपणा करणे . म्ह ० पोराचे चिन्ह डोहाळ्यावरुन ओळखावे . डोहळे , डोहाळ जेवण - न . डोहळतुलीला मेजबानी . पहिल्या गरोदरावस्थेत स्त्रीला डोहाळे लागू लागले म्हणजे ( हल्ली सातव्या महिन्यात ) सुवासनींना भोजनसमारंभ करतात ते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP