Dictionaries | References

जुपणी

   
Script: Devanagari
See also:  जुंपण , जुंपणी , जुपण

जुपणी     

 स्त्री. १ जुंपण्याची क्रिया . २ जुंपणी . ३ जुंपण्याचा सोइस्करपणा , योग्यता ; संवगडयाशीं जुळतें असणें . ह्या बैलाची त्या बैलाची जुंपण आहे . ४ ( कु . ) बैलास बांधण्याची दोरी . - न . ( राजा . ) गाडीची धुरी ; इसाड व जूं याना बांधणारी दोरी . २ जाड , मजबूत पदरांची - दुपेडी तिपेडी दोरी . ३ ( विणकाम ) मागाच्या दुसर्‍या टोकाजवळचें सूत ताणणारें धनुष्याकृति लाकूड ; ह्या लाकडानें व गुलडयानें हें सूत ताणलें जातें . गुलडा पहा .
०जुपणें   जुंपणें - उक्रि . १ जोडणें . २ ( ल . ) गुंतविणें ; कामास लावणें , लागणें . ३ प्रारंभ करणें ; व्यवस्था लावून देणें ( काम , उद्योग , इ० ची ). ४ प्रवृत्त होणें ( युध्द , वाद इ० स ); सुरू होणें . त्याची बोलतां बोलतां अकस्मात लढाई जुंपली . [ सं . युज ; प्रा . जुप्प ] - न . १ जुंपण अर्थ ३ पहा . २ ( विणकाम ) कापड विणून झाल्यावर उरणारीं एक ताण्याचीं शेवटें दुसर्‍या कापड विणावयाच्या ताण्यास जोडण्याचें साधन . ३ ( ल . ) उत्पत्ति ; रचना . जै पहिलें सृष्टीचें जुंपणें । - ज्ञा १४ . ५७ . ४ बैलाच्या गळयांतील दोरी ; जोखडाचा पट्टा ; दोरी ; जुवणी , जुंवाली पहा . [ सं . युज ; प्रा . जुप्प ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP