Dictionaries | References

जिंमा

   
Script: Devanagari
See also:  जिम्मा

जिंमा     

 स्त्री. ( बायकी ) गणति ; जमा ; अंतर्भाव . माणसांत देखील जिंमा व्हावयाची नाहीं त्याची . - एक [ जमा ]
स्त्रीपु . १ भार ; पत्कर ; हमी ; जबाबदारी . ज्यानीं लोकांस मार्ग दाखवून कांहीं प्रकारविशेषानें ज्ञानामृत पाजण्याचा जिंमा घेतला आहे ... - नि ८८७ . मसलत ठरावी त्याप्रमाणें आपलाले जिम्यावर जावें - पया २१५ . २ विश्वास ; जामीन ( वस्तु , मनुष्य , कृत्य यांचा ); ( इं . ) गॅरंटी . ३ ताबा ; हवाला . हे दागिने एवढे तुमच्या जिम्मेस असूंद्या . ४ ( कायदा ) तिसर्‍या इसमाचें वचन , जबाबदारी किंवा देणें पुरें करण्याचा करार ; जामिनकी . तुम्ही जर जिम्मा घ्याल तर ह्याला शंभर रुपये देतों . जिंमेस करणें - स्वाधीन करणें ; हवालीं करणें . पन्नास हजार फौज व तीनशें तोफा तुझे जिंभेस करितों . - भाब ४२ . [ अर . झिम्मा ] जिम्माफारक . जिम्मापारक - वि . जबाबदारींतून मोकळा केलेला ; जिंम्यांतून मुक्त . [ अर . झिम्मा + अर . फारिघ = मुक्त ] जिम्मेदार - वि . जामीन ; जबाबदार ; ज्यानें आपल्या अंगावर जबाबदारी घेतली आहे असा ; ट्रस्टी . [ फा . झिम्मादार ] जिम्मेदारी - स्त्री . जबाबदारी ; हमी . नागरिक सैन्यांतील जिम्मेदारी त्याजवर असे . - इंमू १६९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP