|
पु. १ अनेक परगणे मिळून बनलेला देशाचा विभाग . २ शहराचा भाग ; पेठ ; मोहल्ला . ३ शहराच्या , महालाच्या विशिष्ट भागांतील खटले चालविण्याची जागा , कोर्ट , कचेरी ; पेठेची , वार्डाची मॅजिस्ट्रेट कचेरी ; कोतवाली . ४ सराफ कट्टा . ५ अट्टा ; तळ ( मजूर , गाडया , जनावरें यांचा ); खुंट . ६ ( भिक्षेकर्यांत ) अगदीं सकाळीं भिक्षा मागण्याकरितां ठराविक ठिकाणीं उभें राहण्याची पध्दत , वहिवाट . आज माझा चकला आहे . ७ अशा ठिकाणीं मागितलेली , दिलेली भिक्षा . म्यां चकला केला . मला चकला द्या . [ सं . चक्र ; प्रा . चक्कल ; हिं . चकला ] पु. ( राजा . ) एक हलक्या प्रकारचें गर्भसुती वस्त्र . [ हिं . ] - पु . ( सोनारी ) जरींतून काढलेली चांदी . पु. ( कों . राजा . ) अनेक प्रकारचीं फुलें वगैरे कोरलेली पट्टी ; दागिन्यावर टीक अगर फुलें उठविण्याचा सोनाराचा ठसा . [ हिं . चकलना = दाबणें ; वर दाब टाकणें ]
|