Dictionaries | References

गळी पडणें

   
Script: Devanagari
See also:  गळां पडणें

गळी पडणें     

१. मिठी मारणें
आलिंगन देणें. ‘गेले गृहासि माता धांवुनियां माझिया गळां पडली।’-मोअनु ६.६८. म्‍ह०-लावशील लळा तर पडेल गळां. २. गळ घालणें
आग्रह करणें. ३. अंगावर तुटून पडणें
हल्‍ला करणें. ‘प्राणाची आशा न धरितां तुम्‍ही बेशक त्‍यांचे गळां जाऊन पडला.’-विवि ८.३.५६. ४. भीड घालणें
वजन खर्च करणें
वशीला लावणें. ५. खोड लागणें
संवय होणें
चट लागणें. ६. आळ घेणें
आरोप करणें
अंगी लावण्याचा प्रयत्‍न करणें. ‘गळां मोती असोन निवाडें। लोकांचिया गळां पडे।’ -ह २१.२२९. ‘गळां पडति ज्‍यांचिया तव गुणैकदेशभ्रमें।’-मोकेका ३२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP