|
स्त्री. १ किंमत ; शक्ति ; प्रभाव ; हिंमत ; फिकीर . २ तब्बेत ; प्रकृति ; स्वभाव ( विशेषत ; कडक , वाईट , अहितकारक , निष्ठुर इ० ) ' आदरें करून विनावितां कदर कां कठिण करितां तुम्हीं .' - प्रला १२१ . ३ ठराव ; अधिकार . ' आपणाकडे फौजेचे बेगमीस सरंजाम कदर करून दिला . ' - समारो १ . १५५ . ४ धनीपणाचा डौल . ; अम्मल चालविण्याचा स्वभाव ; वचक ; हुकमत ; धाक ; जरब ; शिस्त ; दरारा . ' नानाची कदर ( मुत्सद्दी म्हणुन ) मोठी होती .' - नि १००९ . ५ गुणांची पारख , चहा , बुज .' त्याचा उद्देश लायकीची कदर करून चांगल्या गोष्टीला उत्तेजन देणें . हाच होय .' - सगाभा २ . ( अर . कद्र = किंमत , महत्व ) नस्त्री . १ गुहा ; दरी . ' दुमदुमिताती गिरिकंदरें । ' - ज्ञा . १ . १३० . २ डोंगरांतील कोंरीव लेणें . ३ ( ल .) अंतःकरण हृदय . ' बोले तों गृहि कृष्ण ये झटकरी आनंदली कंदरीं । ' - नदा ३१ . ( सं .) ०काढणें सोसणें - क्रि . त्रास सहन करणें ; मर्जी , तब्बेत संभाळणें ( रागीट किंवा आजारी मनुष्य , धनी , मूल वगैरेची )
|