Dictionaries | References ओ ओलास्त्रा Script: Devanagari See also: ओलावा Meaning Related Words ओलास्त्रा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ओल ; ओलसरपणा ; दमटपणा ; आर्द्रता . ' जीवनाचा झाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं मावळलं ॥ ' - तुगा ४०५५ . २ ( ल .) किफायत ; लाभ ; नफा . ३ फायद्याचा - यशाचा संभव , शक्यता ; आशादायित्व ; आशेला जागा ; उ० धनाचा अथवा पैक्याचा ओलावा . ४ अंतःकरणांत असलेली सद्यता ; द्यार्द्रता ; कनवाळुपणा ; जिव्हाळा , ' स्नेहाचा निजचित्तीं लेशहि येऊं न देचि ओलावा । ' - मोआदि ५ . १०५ . ' ममतेचा अथवा कृपेचा ओलावा .' ५ अप्रकट द्रव्यांश , तत्त्वांश , तत्त्व , सत्व . उ० बुद्धीचा , शहाणपणाचा ओलावा . ( ओला ) ओलाव्याचा - वि . १ भिजट ; दमट ; सर्द ; ओलसर . २ भरीव ; फायदेशीर इ० अर्थी ओला अर्थ ३ ते ५ पहा . उ० ओलाव्याचा व्यवहार - व्यापार - धंदा - रोजगार - चाकरी , ओलाव्याची ममता - प्रिति - मैत्री - बोलणें . याच्या उलट कोरडा .१ ओलावा पहा . २ ओलीचा आश्रय . ' ही भाजी ओलास्नयास ठेव म्हणजे वाळणार नाही .' - वि . ओलीचा आसारा असलेलें ; आर्द्रतायुक्त . ( ओल + आसरा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP