Dictionaries | References

इंगा फिरला की पिंगा सरला

   
Script: Devanagari

इंगा फिरला की पिंगा सरला     

मनुष्य चांगला पेचात सापडला म्हणजे त्याला स्वपरबलाबलाची बरोबर कल्पना येते व ताठरपणा जातो
तोपर्यंत तो स्वतःच्याच घमेंडीत असतो. एका मनुष्यास पहाटे उठून दूरच्या गांवास जावयाचे होते. त्याने चार घटका रात्रीस उठून आपली सर्व तयारी केली व घोड्यावर खोगीर ठेवून तंग आवळावयास गेला तों तो तुटला. तेव्हा वाटेवरच चांभाराचे घर होते त्याच्याकडे जाऊन त्याला उठवून तंगाकरितां त्याने एक वादी मागितली. चांभाराने अर्धवट झोपेतच उठून घराच्या छपराच्या नीवापासून खाली एक साप लोंबत होता त्यासच वादी समजून ओढून काढून त्यावरून साफ इंगा फिरविला व त्यास वादीसारखे सपाट करून त्या राउतास दिले. लगेच राउताने आलप तंग त्या वादीने आवळून तो पुढे निघाला. वाटेने जातांना त्या सापाचे डोके त्याच्या रिकिबीतील पायाजवळच येत होते. वाटेत एका ठिकाणी दुसरा साप बसला होता त्याने या सापाचे डोके त्या मनुष्याच्या इतक पायाजवळ असून त्यास चावता येत नाही अशा केविलवाण्या स्थितीत पाहून त्यास विचारले की, अरे तू या मनुष्यास चावत का नाहीस. त्यावेळी त्या सापाने उत्तर दिले की, अद्यापि तुझ्यावरून इंगा फिरला नाही म्हणून असे बोलतोस
तो फिरला म्हणजे तुला सर्व समजेल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP