Dictionaries | References अ अबदागिर Script: Devanagari See also: अबदागीर Meaning Related Words अबदागिर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. राजे वगैरे थोर लोकांच्या डोक्यावर सूर्याचें ऊन निवारणार्थ मिरवणुकीच्या वेळीं धरावयाचें छत्र . हें राजासाठीं किंवा सरदारासाठींहि असे . हा एक मान असून तो सरकार ज्याला देईल त्यानेंच ही वापरावयाची ; दुसर्यानें वापरल्यास शिक्षा होई . यासाठीं लागणार्या गड्याचा पगार व दर तीन वर्षांनीं कापड दांडा वगैरेचा खर्च सरकार देई . ही सालीना ६० ते ७० रुपयांची तैनात असे . - थोमारोजभा २ . २७५ . तीस हजार अबदागिरी बरोबर चाले ढिगारा - ऐपो १११ . [ फा . आफ्ताब = सूर्य + गिरफ्तन = पकडणें ].०गिर्या पु. अबदागीर धरणारा सेवक . पगार दरमहा ५ रुपये . - समरो २ . ६० .०बाळ्या स्त्री. कानांत घालावयाच्या ३२ बाळ्यांपैकीं एक दागिना . नालबाळ्या अबदागिरबाळ्या तर्कधर । - अफला ५५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP