-
वि. १ कायम ; निश्चित ; स्तब्ध ; शांत ; न हालणारें ; मजबूत ; बळकट ; निश्चयी . २ एके ठिकाणी कायम राहणारा . ३ विश्वासु ; अस्थिर वृत्तीचा . ५ अचंचल ; फरक न पडणारा ( दिवस , नक्षत्र ), ज्यांच्या ठायीं कार्य आरंभिलें असतां लवकर होत नाहीं व झालें असतां लवकर नाश पावत नाहीं अशीं ( रोहिण्यादि नक्षत्रें . वृषभादि राशी , रविवार इ० याचे उलट चर पहा . ) ६ स्थावर पहा .
-
०प्रतिष्ठा स्त्री. १ ( एखाद्या देवळांत देवतेची ) कायमची स्थापना . २ ( ल .) कोणतेहि ठिकाणचा कायमचा निवास . बुध्दि स्त्री . मन , स्वभाव यांचा कायमपणा , समतोलपणा ; दृढबुद्धि ; याचे उलट चंचलबुद्धि . २ ( ल .) मंदबुद्धि ; जडबुद्धि . वि . अशा बुद्धीनें युक्त . वेळ - वेळा स्त्री . एखाद्या कामास आरंभ केला असतां मंदगतीनें चालून कायम टिकून राहतें अशी वेळ . रात्रीच्या किंवा दिवसाच्या ३ घटिकांच्या आठ विभांगां पैकी आठवा विभाग . वेळ ७ पहा .
-
०स्थावर न. शांतता ; स्तब्धता .- वि . शांत ; सामसुम ; स्वस्थ ; स्तब्ध , गडबड जाऊन शांत स्थितीला आलेलें .
-
०ता स्त्री. निश्चलपणा , शाश्वतपणा ; स्थैर्य ; कायमपणा ; मजबुती , निर्धास्तपणा ; पक्केपणा ; विश्वासुपणा ; थंडपणा ; शांतपणा ( मनाचा ). स्थिराव ( वि ) णें उक्रि , १ स्तब्ध शांत , निश्चित होणें . २ थांबणे ; खंड पडणे . ३ विसावा घेणें ; थांबणे ; राहणे ; टिकणें . ४ स्थिर करणें ; शांत करणें मजबूत करणें ५ बंद पाडणें ; प्रतिकार करणें . स्थैर्य न . स्थिरता पहा .
Site Search
Input language: