|
अनुक्रम सहसंबंध (पहा lag covariance) lag correlation, पश्चता सहसंबंध ( कालक्रमिकेमधील (time series) किंवा अवकाशक्रमिकेमधील (space series) घटकांतील (members) सहसंबंध, कालक्रमिकेतील किंवा अवकाशक्रमिकेतील एकाच दिशेतील कालांतर किंवा अवकाशांतर समान असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर U१,U२, U३, .... हे क्रमिकेतील घटक असतील तर (U१, U४) (U२, U५) (U३,U६) ... या जोड्यांमधील सहसंबंधाला तिसऱ्या कोटिकेचा (order) 'अनुक्रम सहसंबंध' असे म्हणतात. तथापि, काही लेखक याच सहसंबंधाला स्वयंसंबंध (autocorrelation) ही संज्ञा वापरतात, मग ती क्रमिका नमुना म्हणून असो किंवा समष्टी (population) म्हणून असो; आणि 'अनुक्रम सहसंबंध' ही संज्ञा दोन भिन्न क्रमिकांमधील सहसंबंधाकरिता वापरतात.)
|