-
पु. १ सागर ; दर्या ; अर्णव ; उदकराशि ; उदधि ; जलधि . २ ( ल . ) अमर्याद सांठा ; विस्तीर्ण , अफाट , अगणित असा समूह , पदार्थ वगैरे ( उदा० देव , मानवी जीवित , भाषा , शास्त्र , शक्ति , सद्गुण ) या कल्पनेवरून भवसमुद्र , गुणसमुद्र असे अनेक सामासिक शब्द बनतात म्ह० समुद्रास दुखणें शिंपींत औषध . ( वाप्र . ) समुद्राखालचा - समुद्रकांठचा ; किनार्यावरील . समुद्राचें अर्ध्य समुद्रास - ज्या वेळीं मिळालेल्या देणगीपैकींच कांहीं परत देतात तेव्हां योजतात . समुद्राचें मीठ डोंगराचे आवळे मिळणें - परस्पर विरुध्द किंवा परस्परांपासून फार दूरच्या वस्तू एकत्र आल्या असतां म्हणतात . सातासमुद्रां पलीकडे - अतिशय दूर ; दुर्गमस्थळीं . साता समुद्रांपलीकडे ठेवणें - अतिशय जतन करणें ; दुष्प्राप्य स्थळीं ठेवणें ; बहुमोल मानणें . समुद्रांत जाऊन , समुद्रांत पडून , समुद्रांत कोरडा , समुद्रांत सुकास - १ अमूल्य संधि मिळूनहि ज्यास फायदा झाला नाहीं असा दुर्दैवी . २ दुष्कर्मात गढून पुन्हां उजळ माथ्यानें हिंडणारा किंवा नीतीची बढाई मारणारा . समुद्रांत सुई पाहणें , समुद्रांत सुई शोधणें - अशक्य किंवा अप्राप्य गोष्टीसाठीं निष्फळ प्रयत्न करणें . सामाशब्द -
-
वि. मोहरबंद ; शिक्का असलेलें ; मुद्रा असलेलें . [ सं . स + मुद्रा ]
-
०कफ पु. समुद्रफेंस ; एका माशाचें हाड . समुद्रमाणकी ; सिंधुकफ ; सुफेन .
-
०कमळ न. एक प्राणि . हा डेझी सारखा असतो . - प्राणिमो १४५ .
Site Search
Input language: