-
पु. १ चोरणारा , चोरी करणारा , दुसर्याची वस्तु त्याला नकळत , जबरदस्तीनें लुबाडणारा माणूस . चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा । - दा १९ . ९ . ९ . २ ( एखाद्यापासून कांहीं गोष्ट , वस्तु इ० ) छपवून , लपवून ठेवणारा ; ( एखादी गोष्ट स्वत : पाशींच ) दाबून ठेवणारा , दडपून टाकणारा . ३ केंळफुलांतील फणीच्या दात्यांतील कठिण व पसरट माथ्याची काडी , दांडा . यास कावळा असेंहि म्हणतात . हा भाजीच्या उपयोगी नसती म्हणून फेंकून देतात . ४ ( समासांत ) प्रछन्न ; गुप्त ; लपविलेला ; छपविलेला ; राखून ठेवलेला ; खाजगी ; आड ; बाजूचा ; कोंपर्याचा इ० अर्थी . उ० चोर - अडसर - अरगळ - कडी - खीळ - गांठ - छिद्र इ० . असे अनेक सामासिक शब्द बनले आहेत . ५ ( गंजिफा , पत्ते , इ० खेळांतील परिभाषा ) एक पान ; प्रत्येक रंगांतील हुकुमाच्या खेरीज इतर पान , पत्ता . त्याच्या हातांत एकच बाकी राहिलेला पत्ता हुकुम नसावा तो चोर असावा . ६ ( स्वत : स ) मागें राखणारा ; चोरून ठेवणारा ; अंग काढतें घेणारा , चुकविणारा ; चुकार याअर्थी पुढें चोर शब्द लावून अनेक सामासिक शब्द होतात . उदा० कमलचोर = लिहितांना कांहीं गोष्टी राखून ठेवणारा , दाबून ठेवणारा , वगळणारा , चोरून ठेवणारा ; सांगितल्याबरहुकूम न लिहिणारा . खांदचोर = १ दुसर्याबरोबर काम करतांना जो आपला खांदा काढता घेतो तो ( मनुष्य , पशु इ० ); कामचुकार . २ ( ल . ) निकडीच्या वेळीं मदत , द्रव्य देण्याचें कर्तव्य न करणारा ; तोंडघशीं पाडणारा . चाकरीचोर = लबाडीनें चाकरींत , सेवेंत कुचराई , अंगचोरपणा करणारा . पाठचोर = सहज रीतीनें , सहजासहजीं पाठीवर बसूं देणारा ( बैल ). पायचोर = १ एखाद्या करारांतून , कामांतून गुप्तपणें , गपचिप काढतें घेणारा , अंग काढून घेणारा . २ चोरटेपणानें , हळूच , आवाज होऊं न देतां पाऊल टाकणारा ; चाहूल न देणारा . ३ चालण्यांत , पळण्यांत कुचराई करणारा ( मनुष्य , घोडा ). बळचोर = बळ राखून , जेवढें खर्चावें तेवढें न खर्चून काम करणारा ; चुकार ; मन : पूर्वक शक्य तितकें शक्तिसामर्थ्य खर्च न करणारा . मतलबचोर = आपला हेतु , बेत गुप्त ठेवणारा ; मतलबाचा थांग लागूं न देणारा . मसलतचोर = १ स्वत : ची योजना , मसलत गुप्त ठेवणारा . २ दुसर्याची मसलत फोडणारा , काढून घेणारा . विद्याचोर = १ शिकावयाच्या विद्येचा , शास्त्राचा कांहीं भाग विद्यार्थ्यांपासून चोरून ठेवणारा ; पुरी विद्या न देणारा ( शिक्षक ). २ विद्या चोरणारा ; चोरून शास्त्रीय ज्ञान , गुह्य संपादन करणारा ; नकळत विद्या मिळविणारा ( शिष्य ) इ० . अंगचोर , कामचोर इ० आणखी अनेक सामासिक शब्द आहेत . वरील शब्द कामचोरू , खांदचोरू , अंगचोरू असेहि योजण्याचा प्रघात आहे . [ सं . ] ( वाप्र . ) चोरांची दावण देणें - चोरांची दावण बांधून त्यांचीं डोकीं सडकणें , चाबकानें बडवणें . म्ह० १ चोराच्या मनांत चांदणें = चोराला चांदण्याचें भय वाटतें , कारण त्यांत त्याची चोरी उघडकीस येण्याची भीति असते . चोराचें मन नेहमीं त्यास खात असतें . अपराध्याला नसती शंका येत असते . वाढति सदगुण तों तों प्रेम करिति लोक पांडवावरि ते । चोरासि चांदणेसें तापचि देतें सुयोधना अरितें । - मोमंभा १० . २ चोरावर मोर = एका चोराला लुबाडणारा दुसरा सवाई चोर ; एक वरचढ एक ; शेरास सवाशेर . तो आतां चोरावर मोर होण्याच्या विचारांत गढून गेला होता . - स्वप २१३ . सामाशब्द -
-
०अंक अंख आंख - पु . १ कापडाच्या गांठीवर , कापडावर , विक्रीच्या वस्तूवर घातलेला , खरी किंमत दाखविणारा , अत्यंत बारीक आंकडा . हा आंकडा दुकानदाराच्या स्वत : च्या उपयोगाकरितां असतो . हा गिर्हाइकास कळवावयाचा नसतो . गिर्हाइकाकरितां किंमतीचा दुसरा मोठा पण खोटा आंकडा दिलेला असतो . २ हस्तलिखित पुस्तकच्या पानावर घातलेला अनुक्रमाचा बारीक आंकडा . ३ ( सामा . ) गुप्त आंकडा . [ चोर = गुप्त , खासगी + अंक = आंकडा ] ओंटी - स्त्री . दिसण्यांत लहान पण फार दूध देणारी ( गाईची , म्हशीची ) ओटी , कांस .
-
चोरओटी भरणें
-
०ओंटी सक्रि . स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें ( गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून ) ओटी भरणें . तीन महिनेपर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात . ओटीभरण पहा . [ चोर = गुप्त + ओटी ]
Site Search
Input language: